Maharashtrachi HasyaJatra Fame Arun Kadam New Car : आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अरुण कदम. आजवर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये तसेच कॉमेडी शोजमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे त्यांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अरुण कदम यांना त्यांचे चाहते प्रेमाने ‘लाडका दादूस’ म्हणतात. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या दादूसने नुकतीच नवीन गाडी खरेदी केली आहे.

अरुण कदम यांनी त्यांच्या नव्या गाडीची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यांच्या घरी ‘मारुती सुझुकी SUV Victoris’ या गाडीचं आगमन झालं आहे. नवीन गाडी घेण्यासाठी अरुण कदम यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र पोहोचलं होतं. त्यांची पत्नी, मुलगी, जावई, नातू असे सगळेजण यावेळी उपस्थित होते. गाडीची पूजा पार पडल्यावर अरुण कदम त्यांच्या नातवासह ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आपली हक्काची गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदाच्या वर्षी अनेक कलाकारांच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे. यामध्ये आता अरुण कदम यांचंही नाव जोडलं जाणार आहे. त्यांनी नवीन गाडी खरेदी केल्याच्या व्हिडीओवर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अरुण कदम यांनी खरेदी केलेल्या मारुती सुझुकी Victoris SUV गाडीची एक्स शोरूम किंमत १०.४९ लाख ( बेस मॉडेल ) ते १९.९९ लाखांपर्यंत आहे. ही SUV पेट्रोल, CNG आणि स्ट्राँग हायब्रिड पर्यायांसह ३० हून अधिक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. शहरांनुसार या गाडीच्या किमतीत बदल होऊ शकतो.

दरम्यान, अरुण कदम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अरुण कदम. आजवर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये तसेच कॉमेडी शोजमध्ये काम केलेलं आहे. अरुण कदम यांना घराघरांत ‘लाडका दादूस’ अशी ओळख मिळालेली आहे. अरुण कदम यांनी कायम प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेची नोकरी सांभाळून त्यांनी हा कलेचा वारसा पुढे नेला म्हणूनच त्यांचा प्रवास अधिक प्रेरणादायी वाटतो.