Actress Rutuja Chipade Blessed with Baby Boy : ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्री ऋतुजा चिपडे आई झाली आहे. ऋतुजा चिपडेला मुलगा झाला आहे. मुलगा तीन महिन्यांचा झाल्यावर तिने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.
ऋतुजाने जुलै महिन्यात हिरव्या साडीतील फोटो पोस्ट केले होते. यात ऋतुजाने बेबी बंप फ्लाँट केला होता. तेव्हाच ती आई होणार असल्याची गोड बातमी तिने दिली होती. आता तिने मुलाच्या जन्माची माहिती दिली आहे.
ऋतुजा चिपडेला २१ सप्टेंबर २०२५ रोजी मुलगा झाला. “Our world just turned blue in the sweetest way,” असं कॅप्शन देत ऋतुजाने तिच्या डोहाळे जेवणातील फोटो पोस्ट केले आहेत.
पाहा ऋतुजा चिपडेची पोस्ट
‘लग्नाची बेडी’ मालिका संपल्यानंतर ऋतुजा छोट्या पडद्यावर झळकलेली नाही. ऋतुजा चिपडे सध्या ब्रेकवर आहे. ती मुलाबरोबर व कुटुंबाबरोबर वेळ घालवतेय.
दरम्यान, ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत काजल ही भूमिका साकारली होती. ऋतुजाने ‘हिमालयाची सावली’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘बायको अशी हवी’, ‘सुंदरी’, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘यशोदा’ या लोकप्रिय मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या.
