Rujuta Deshmukh daughter Sajiri Joshi: ऋजुता देशमुख ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी सिनेमांसह मालिकांतही काम केले आहे. सध्या त्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांची मानिनी ही भूमिका प्रेक्षकांची लाडकी आहे.

ऋजुता देशमुखच्या मुलीला पाहिलंत का?

ऋजुता देशमुख यांची मुलगी साजिरी जोशीही अनेकदा चर्चेत असते. आईप्रमाणेच तीसुद्धा अभिनय क्षेत्रात काम करत आहे. साजिरी जोशीने २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या एप्रिल मे ९९ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रोहन मापुस्कर दिग्दर्शित या सिनेमाला लोकप्रिय ठरला. आजही सिनेमाचे कौतुक होते. या सिनेमातून साजिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. कोकणाची पार्श्वभूमी, उन्हाळ्याची सुट्टी आणि मित्रांचे ठरलेले प्लॅन या सिनेमात पाहायला मिळाली. अनेक गमती-जमती एप्रिल मे ९९ मध्ये पाहायला मिळाल्या.

एप्रिल मे ९९ नंतर साजिरी जोशी बाई तुझ्यापायी या वेब सीरिजमध्ये दिसली. झी ५ वर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेने लक्ष वेधून घेतले. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित बाई तुझ्याबाई सीरिजमध्ये तिने अहिल्या ही भूमिका साकारली आहे; तर क्षिती जोगही प्रमुख भूमिकेत दिसली.

याबरोबरच, ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीझन ४’ या शोचे तिने उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन केले. आता या शोनंतर साजिरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनाट्याच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हॅनाची सूटकेस, असे या अभिनाट्याचे नाव आहे. नुकतेच याचे पोस्टर शेअर करण्याच आले आहे. त्यामधील साजिरीचा लूक लक्ष वेधून घेत आहे. तिने दोन वेण्या घातल्याचे दिसत आहे. रावी मोशन निर्मिती असलेल्या या अभिनाट्याचे दिग्दर्शन जयेश आपटेंनी केले आहे; तर सहदिग्दर्शक हृषिकेश पाटील आहेत.

या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करीत साजिरीला शुभेच्छा दिल्या आहेत. मुग्धा गोडबोले रानडे यांनी कमेंट्स करीत ऑल दी बेस्ट, असे लिहिले आहे. क्षिती जोगने हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. पर्ण पेठे, क्षमा देशपांडे यांनीदेखील कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, साजिरी व ऋजुता ही मायलेकीची जोडी कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. त्या सारख्या दिसत असल्यामुळे चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात.