Lagnanantar Hoilach Prem upcoming twist:’लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत विविध ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. काव्या, जीवा, नंदिनी, पार्थ, रम्या ही सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, जीवा आणि काव्याचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याची स्वप्ने पाहिली होती. पण दोघेही कमावते होण्याची वाट पाहत होते. याचदरम्यान, जीवाचा भाऊ नंदिनी आणि काव्याची बहीण नंदिनी यांचे एकमेकांशी लग्न ठरले. मात्र, पार्थच्या वसू आत्याची मुलगी रम्या हिचे पार्थवर प्रेम होते. तिला पार्थबरोबर लग्न करायचे होते.
पार्थबरोबर रम्याचे लग्न व्हावे यासाठी वसू आत्याने कारस्थान केले. तिच्या कारस्थानामुळे काव्याला पार्थबरोबर लग्न करावे लागले. जेव्हा हे जीवाला समजले, तेव्हा दुखावलेल्या जीवाने जेव्हा नंदिनीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा नंदिनीबरोबर लग्न केले. लग्नानंतर काव्याने अनेकदा घटस्फोट घ्यावा आणि चौघांनीही आपापल्या मार्गानी निघून जावे असे सुचवले. मात्र, पार्थ आणि नंदिनी यांनी या नात्याला संधी देण्याचे ठरवले. मात्र, एक वेळ अशीही आली, जेव्हा त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
पुढे असेही पाहायला मिळाले की पार्थ व काव्या आणि जीवा व नंदिनी यांच्यात मैत्री होताना दिसली. काव्यात मनात पार्थविषयी जागा निर्माण झाली. हळूहळू जीवाही नंदिनीच्या प्रेमात पडला. या सगळ्यात काव्या व जीवाच्या भूतकाळाबद्दल पार्थ किंवा नंदिनीला माहित नव्हते.
काही दिवसांपूर्वी काव्या व जीवा यांच्या भूतकाळाबद्दल सर्वांना समजले. त्यावेळी कुटुंबियांना धक्का बसला. तर पार्थ व नंदिनी दुखावले गेले. पण, यानंतर काव्या व जीवा यांनी एकत्र येत पार्थ व नंदिनीचा विश्वास पुन्हा जिंकायचा असा निर्धार केला. त्यासाठी काव्या पुन्हा देशमुखांच्या घरी परता आहे. तर जीवा नंदिनीच्ा घरी गेला आहे.
आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा प्रोमो पाहायला मिळत आहे. या प्रोमेमध्ये पाहायला मिळते की पार्थ त्याची फाईल बघत जात असतो. काव्या त्याला जाऊन धडकते. त्या फाईलमधील पाने घरात सगळीकडे पसरतात. तिला तोल जाणार तोच पार्थ तिला सावरतो. तिथे घरातील इतर मंडळी येतात. रम्या काव्या आणि पार्थकडे येत असते. तितक्यात एका पानावरुन तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते.
काव्या पडणार रम्यावर भारी
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की रम्या पार्थला हाक मारते आणि म्हणते की पार्थ मला हात तरी दे. पार्थ पुढे जाणार तितक्यात काव्या पुढे येते आणि ती रम्याला हात देऊन उठवते. ती तिला म्हणते, “रम्या यापुढे कधीही पडलीस तर मला हाक मार. मी तुला पुरून उरेन.”
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “काव्या पडणार रम्यावर भारी…”, अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, आता काव्या व जीवा पुन्हा एकदा नंदिनी व पार्थ यांचा विश्वास जिंकू शकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
