‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका सतत प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढवताना दिसते. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अ‍ॅक्शन सीन दाखवण्यात आला असून सूर्या मारामारी करताना दिसत आहे.

सूर्या दादा आणि शत्रू एकमेकांशी भिडणार

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला गावातील एक मुलगा त्याला म्हणतो, “ए सूर्या तुलादेखील तुझ्या आईसारखी पळ काढायची सवय लागली वाटतं.” त्यावर तिथे असलेले सगळे त्याच्यावर हसतात. त्यानंतर त्यांच्यात मारामारी सुरू होते. यामध्ये त्याला दुखापत झालेलीदेखील दिसत आहे. त्यानंतर अचानक तुळजाचा भाऊ शत्रू त्याच्यासमोर येतो. व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, सूर्या त्याच्या घरी असून त्याच्या घरातील संपू्र्ण कुटुंब त्याच्याभोवती जमले आहे. त्याचवेळी तुळजाच्या वडिलांकडून म्हणजेच डॅडींकडून त्यांना हा निरोप मिळतो की, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या घरी बोलावले आहे. हा निरोप ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, “राडा होणार, सूर्या दादा आणि शत्रू एकमेकांशी भिडणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सूर्याची आई पळून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला प्रचंड मानहानीचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे त्याचे वडील दारू प्यायला लागतात. घराची संपूर्ण जबाबदारी सूर्यावर येते. त्याला चार बहिणी आहेत, त्यांचे लग्न करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आई पळून गेल्यामुळे त्यांना लग्न जुळवताना अडचणींचा सामना करावा लागतो. आता सूर्याचे तुळजाबरोबर लग्न झाले आहे. हे लग्न तिला मान्य नसल्यामुळे ती घर सोडून जाणार होती, मात्र बहिणींची लग्न होईपर्यंत थांब असे सांगत त्याने तिला थांबवले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: “अविनाशच्या अहंकारासाठी मी…”, रेशनसाठी करणवीर मेहराने घेतली ठाम भूमिका; नेटकरी कौतुक करत म्हणाले…

तुळजाचे लग्न तिच्या वडिलांनी दुसरीकडे ठरवले होते, मात्र तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर लग्न करण्यासाठी ती सूर्याच्या मदतीने लग्न मंडपातून पळून गेली. सिद्धार्थने तिला फसवले, मात्र या सगळ्यात डॅडींनी तिचे लग्न सूर्याबरोबर लावून दिले आहे. सूर्याने फसवणूक केली आहे, असे समजून शत्रू त्याला सतत त्रास देताना दिसतो. आता ते एकमेकांच्या समोर आले आहेत.

आता सूर्या आणि शत्रूमध्ये नेमके काय घडणार, डॅडींनी त्यांना घरी का बोलवले असेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.