‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका सध्या वेगळे वळण घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. वेगळ्या कथानकामुळे या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये देवीचे दागिने चोरीला गेल्याचे पाहायला मिळत आहे.

देवीचे हरवलेले दागिने सूर्याच्या बहिणीकडे सापडले

व्हिडीओच्या सुरुवातीला पुजारी देवीचे दागिने चोरी झाले, असे सांगतो. त्यानंतर सत्यजितचा भाऊ प्रत्येकाची झडती घ्या, असे म्हणतो. ते दागिने सूर्याच्या बहिणीच्या पर्समध्ये सापडतात. त्यानंतर तुळजाचा भाऊ म्हणतो, “आई, तिकडे पुजाऱ्याबरोबर पळून गेली. पोराचं काय तर घरंदाज पोरींना पळवतो आणि आता बहीण, देवीचे दागिनेच?”, त्यानंतर पोलिसांची गाडी येते. पोलीस विचारतात, कुठेय तो चोर? तुळजाचा भाऊ सांगतो, घेऊन जा हिला. त्यानंतर सूर्याची बहीण राजश्री त्याला मिठी मारून दादा, असे म्हणत रडताना दिसत आहे.

marathi actors visited prarthana behere new home in alibaug
प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अभिनेत्रीच्या अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समोर
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
prasad jawade wife amruta deshmukh writes romantic post after husband won best actor award
“लग्न झाल्यावर वनवास भोगायला…”, पुरस्कार जिंकल्यावर प्रसादच्या खऱ्या आयुष्यातील ‘पारू’ची खास पोस्ट! अमृता म्हणाली…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : तुळजा देणार सूर्यासमोर प्रेमाची कबुली? ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत मोठा ट्विस्ट
Aabhalmaya
२५ वर्षांनी एकाच मंचावर आले ‘आभाळमाया’चे कलाकार, सर्वांना पाहून भारावले प्रेक्षक; कमेंट करत म्हणाले, “आम्ही नशीबवान…”
dhananjay powar family welcome irina at kolhapur
Video : “नुसतं प्रेम भावा…”, म्हणत परदेसी गर्ल पोहोचली कोल्हापुरात! घरी येताच धनंजय पोवारच्या आई अन् पत्नीने औक्षण
Rohini Hattangadi
“‘बाईपण भारी देवा’च्या रिलीजनंतर मी म्हटलं होतं…” रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आठवण
इन्स्टाग्राम

तेजश्री, धनश्री व भाग्यश्री या त्याच्या बहिणीदेखील तिथे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्याबरोबर तुळजादेखील आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंवर आधारित ‘येक नंबर’ चित्रपटाने ५ दिवसांत कमावले फक्त ‘एवढे’ लाख…; जाणून घ्या कलेक्शन

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, डॅडींनी तुळजाचे लग्न सत्यजितशी ठरवलेले असते. मात्र, डॉक्टर असलेल्या तुळजाला अशिक्षित सत्यजितबरोबर लग्न न करता, तिच्या बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर लग्न करायचे असते. या सगळ्यात तिला सूर्या मदत करतो. मात्र, जेव्हा सूर्या आणि तुळजा ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा सिद्धार्थ तिथे येत नाही. अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो सापडत नाही. सूर्या आणि तुळजा जेव्हा परत येतात, तेव्हा रागावलेले डॅडी तुळजा आणि सूर्याचे लग्न लावून देतात. त्यानंतरही ते सिद्धार्थला शोधत राहतात. जेव्हा सूर्याच्या वडिलांना तात्यांना दवाखान्यात दाखल केले जाते, त्यावेळी त्याला सिद्धार्थ दिसतो. तो त्याचा पाठलाग करतो, तेव्हा तो एका मुलीबरोबर दिसतो. सिद्धार्थ तुळजाला फसवत असल्याचे त्याला समजते. सूर्या त्याचा खरा चेहरा तिच्यासमोर आणायचे ठरवतो.

दुसरीकडे तुळजाच्या घरच्यांना असे वाटते की, सूर्याने तुळजाला तिच्या लग्नादिवशी पळवून नेले होते. त्यामुळे तिचा भाऊ सूर्याच्या घरच्यांना सतत त्रास देताना दिसतो.

आता बहिणीच्या पर्समध्ये कोणी दागिने ठेवले, हे सूर्या शोधून काढणार का, मालिकेत पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.