'लाखात एक आमचा दादा' ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुळजा आणि सूर्या ही पात्रे प्रेक्षकांना आवडत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आता झी मराठी वाहिनीने 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये तुळजाच्या पत्रिकेत विधवेचा योग असून तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून तिचे लग्न रेड्याबरोबर लावण्याचा प्रस्ताव तिच्या सासरच्यांनी मांडल्याचे पाहायला मिळाले आहे. 'तुळजाचं लग्न रेड्याशी होणार आणि मग जंगी वरात' प्रोमोच्या सुरुवातीला, 'तुळजाचं लग्न रेड्याशी होणार आणि मग जंगी वरात' असं म्हणून तुळजाचा होणारा नवरा सत्यजित मोठमोठ्याने हसताना दिसत आहे. त्याचे हे बोलणे तुळजा ऐकते आणि घाबरून आता मी काय करू? असं स्वत:शीच बोलताना दिसत आहे. तिचा भाऊ शत्रू तिला सांगतो की, तुझ्या पत्रिकेत विधवा होण्याचा योग आहे. लग्न केलंस तर दोन महिन्यात नवरा मरेल. तुळजा तिच्या सासरच्या लोकांना विचारते, कुठल्या युगात जगतोय आपण? आणि आईला सांगते, मी असलं काही करणार नाही. हे ऐकल्यानंतर सत्यजितची आजी तुळजाच्या आईला म्हणते, तुमच्या नवऱ्याला सांगा, हे लग्न मोडलं. तेवढ्यात तुळजाचा भाऊ शत्रू म्हणतो, हे लग्न मोडणार नाही, मी पण बघतोच कशी लग्नाला उभी रहात नाही, असे म्हणत तो तुळजाच्या हाताला धरून ओढत नेतो. तुळजा त्याला शत्रू सोड असे म्हणताना दिसत आहे. https://www.instagram.com/zeemarathiofficial/reel/C-j7w15qXx_/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== झी मराठी इन्स्टाग्राम या सगळ्यात सूर्या तुळजाच्या घराच्या गेटबाहेर आहे. तो मनातल्या मनात हे म्हणताना दिसत आहे की, खरंच तो सत्यजित आजच तुळजाशी लग्न करणार नाही ना? असं झालं नाही पाहिजे. काही पण करून मला बंगल्याच्या आत शिरावंच लागेल. यावेळी मुंडावळ्या बांधलेली तुळजा आणि सजवलेल्या रेड्याच्यामध्ये आंतरपाट धरलेले दृश्य पाहायला मिळत आहे. हेही वाचा: “म्हणून मला ‘देवदास’सारख्या भूमिका आवडत नाहीत…”, स्वत:च्याच गाजलेल्या पात्राविषयी असे का म्हणाला शाहरुख खान? याआधी समोर आलेल्या प्रोमोमध्ये तुळजा आणि सूर्याचे लग्न झालेले दाखवले होते. ते दोघे लग्न करून सूर्याच्या घरी येतात आणि सूर्याच्या बहिणी त्यांचे आनंदाने स्वागत करतात, असे या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले होते. आता सूर्या तुळजाला रेड्याची बायको बनण्यापासून वाचवू शकणार का? यामुळे मालिकेत कोणते नवे वळण येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.