‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. डॅडींनी आपल्या लाडक्या लेकीचं म्हणजे तुळजाचं लग्न रागाच्या भरात सूर्यादादाशी लावलं. त्यामुळे सध्या तुळजा आणि सूर्याच्या लग्नानंतरची गोष्ट पाहायला मिळत आहे. लवकरच दोघांचा गोंधळ होणार आहे. पण या गोंधळात तुळजाचा भाऊ सूर्याला मारण्याचा एक कट रचणार आहे. भावाच्या या कटातून तुळजा सूर्याचा जीव कशी वाचवते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच दुसऱ्याबाजूला या मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओला मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करताना दिसतात. सध्या एक मल्याळम गाणं खूप व्हायरल होतं आहे. याच गाण्यावर काही दिवसांपूर्वी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांनी मजेशीर व्हिडीओ केला होता.

navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : तुळजाची ‘ती’ मागणी तात्यांच्या जीवावर बेतणार; ‘लाखात एक आमचा दादा’चा नवा प्रोमो, सूर्या म्हणाला, “त्यांची दारू…”
zee marathi new serial Laxmi niwas first promo
‘झी मराठी’वर सुरू होणार ‘लक्ष्मी निवास’! कन्नड मालिकेचा रिमेक, प्रमुख भूमिकांसाठी ‘या’ दोन नावांची चर्चा
Tula Shikvin Changlach Dhada
Video : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत घटस्थापनेच्या दिवशी दुर्गेश्वरीनं रचलं कारस्थान; प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “हाकलून द्या…”
Lakhat Ek Amcha Dada Upcoming Episode After marriage Surya gave the word to Tulja
Video: “एका वर्षाच्या आत…”, लग्नानंतर सूर्याने तुळजाला दिला ‘हा’ शब्द, हात जोडून म्हणाला, “आधीच मोठा डाग लागलाय…”
Appi Aamchi Collector
Video: ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये मोठा ट्विस्ट; अप्पी आणि अर्जुन होणार वेगळे, अमोलची देवाला प्रार्थना म्हणाला, “मला काही झालं…”

हेही वाचा – Video: मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी, पुन्हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील राजश्री म्हणजेच अभिनेत्री इशा संजयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्या दादा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण इतर कलाकारांसह मालिकेच्या दिग्दर्शकाला घेऊन डान्स करताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओला १७ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून ३२ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे.

‘लाखात एक आमचा दादा’मधील कलाकारांच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते अविनाश नारकर म्हणाले, “क्या बात है… व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा…कामाबरोबर अशी मजा, मस्ती झालीच पाहिजे सेटवर… “तर अभिनेत्री श्वेता खरातने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तसंच “किती एन्जॉय करतात यार हे सर्व”, “खूप छान डान्स झाला”, “कसला भारी व्हिडीओ आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

Comments
Comments

हेही वाचा – Video: अंकिता, पंढरीनाथने निक्कीची केली हुबेहूब नक्कल, ‘बी’ टीममध्ये रंगली निक्कीच्या चालण्यावरून चर्चा

दरम्यान, सूर्यादादाच्या चार बहिणीची भूमिका अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समृद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) यांनी साकारली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.