Anuj Prabhu on Divya Pugaonkar: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील सर्वच पात्रांची चर्चा होते. लक्ष्मी, श्रीनिवास, व्येंकी, भावना, जान्हवी, सिद्धू हे सगळेजण कायमच एकमेकांसाठी उभे असतात. त्यांना बऱ्याचदा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आयुष्यात चढ उतार येतात, मात्र ते त्या संकटांचा सामना करतात. या सगळ्यात जान्हवी व विश्वा यांची मैत्री लक्ष वेधून घेते.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, जान्हवी व विश्वा हे कॉलेजमधील मित्र आहेत. त्यांच्यात उत्तम मैत्री आहे. जान्हवी विश्वाला प्रेमाने मॅड असेही म्हणते. विश्वा जान्हवीच्या प्रेमात पडला. ज्यावेळी तो तिला हे सांगण्यासाठी गेला त्यावेळी जान्हवीने तिचे लग्न ठरल्याचे सांगितले. जान्हवीला विश्वाच्या प्रेमाबद्दल काहीच कल्पना नव्हती. जान्हवीने जयंतशी लग्न केले. मात्र, जेव्हा जयंतने जान्हवीला त्रास दिला. विकृत पद्धतीने वागून तिला त्रास दिला. त्यानंतर जान्हवीने जयंतपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच, तिने जयंतलाही त्रास दिला. या सगळ्यात विश्वाने तिला साथ दिली. त्याने त्याचे मैत्रीचे नाते कायमच जपले.
अनुज प्रभू काय म्हणाला?
विश्वा ही भूमिका अभिनेता अनुज प्रभूने साकारली आहे, तर जान्हवी ही भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकरने साकारली आहे. पडद्यावर जशी त्यांची मैत्री पाहायला मिळते, तशीच मैत्री त्यांची खऱ्या आयुष्यातदेखील आहे. विविध मुलाखतींमध्येदेखील ते त्यांच्या मैत्रीबद्दल सांगतात.
आता दिव्याच्या वाढदिवसानिमित्त अनुजने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्याने लिहिले, “खूप चांगल्या व्यक्तीला आणि सेटवर गाणी म्हणण्यात साथ देणाऱ्या माझ्या पार्टनरला शुभेच्छा, हॅपी बर्थडे दिव्या!” हा फोटो शेअर करताना त्याने जानू मेरी जान हे गाणे लावले आहे. त्याचा संदर्भ देत अनुजने लिहिले की, की कॅप्शनमधील या शुभेच्छा अनुजने दिव्याला दिल्या आहेत. मात्र, हे गाणे विश्वाकडून जान्हवीसाठी आहे.

आता मालिकेत विश्वा व जान्हवी यांची मैत्री पुढे कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येतात. सतत काहीतरी घडताना दिसते. लक्ष्मी व श्रीनिवास यांच्यावर संकटे कोसळतात, मात्र ते त्याला धैर्याने सामोरे जातात. आता लक्ष्मी निवास या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
