Lakshmi Niwas fame actors dance: दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या आधीपासूनच त्याची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असते, सर्वजण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता कलाकारसुद्धा विविध गाणी, डान्स, व्हिडीओ शेअर करत गणेशोत्सवासाठी आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते सण गौरी गणपतीचा या गाण्यावर सादरीकरण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडीओमध्ये जान्हवी, हरीश, सिंचना, वीणा, व्येंकी हे पाचजण दिसत आहेत. सगळेजण मालिकेतील त्यांच्या गेटअपप्रमाणे तयार झाले आहेत. त्यांच्या डान्सस्टेपबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आनंद लक्ष वेधून घेत आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांचा डान्स

हा व्हिडीओ शेअर करताना दिव्या पुगावकरने, “आतुरता बाप्पाच्या आगमनाची…”, अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

एका नेटकऱ्याने लिहिले, “गणपती बाप्पा मोरया’, दुसऱ्या एकाने लिहिले, “पुढच्या वेळी रीलमध्ये आम्हाला अनुज प्रभूला पाहायचे आहे”, एकाने लिहिले, “मस्त डान्स केला. भारी”, आणखी एकाने लिहिले, “खूप दिवसांनी तुम्ही रील्समध्ये दिसला” एकाने लिहिले, “एकच नंबर”, एकाने लिहिले, “या गाण्यावरील सगळ्यात बेस्ट डान्स”, आणखी एकाने लिहिले, “जानू एकदम भारी”, एकाने लिहिले, “सगळ्यांनी छान डान्स केला”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर अनेक नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

लक्ष्मी निवास मालिकेत दिव्या पुगावकरने जान्हवी ही भूमिका साकारली आहे. महेश फाळकेने व्येंकी ही भूमिका साकारली आहे, तर मीनाक्षी राठोडने वीणा ही भूमिका साकारली आहे. मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये मालिकेत सात वर्षांचा लीप येणार असून अनेक बदल होणार आहेत.

दरम्यान, लक्ष्मी निवास मालिकेत नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.