Lakshmi Niwas Meghan Jadhav Kelvan : ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत विकृत जयंतची निगेटिव्ह भूमिका अभिनेता मेघन जाधव साकारत आहे. यापूर्वी त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र, जयंतच्या भूमिकेमुळे मेघनला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. नकारात्मक भूमिका असूनही प्रेक्षक त्याच्या अभिनय शैलीचं भरभरून कौतुक करत आहेत. प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत जयंतने त्याच्या खऱ्या आयुष्यातील जान्हवी सर्वांना दाखवली आहे.
अभिनेता मेघन जाधव लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरशी लग्न करणार आहे. या दोघांनी नुकतीच सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली चाहत्यांसमोर दिली. या दोघांची लव्हस्टोरी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या सेटवर सुरू झाली होती. या शोमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. मेघन-अनुष्का सुरुवातीला एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकत्र बिझनेस सुद्धा सुरू केला आहे. याशिवाय मेघन आणि अनुष्का कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात.
मेघन व अनुष्का गेली अडीच वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. नोव्हेंबर महिन्यातच हे दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या या दोघांची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकतंच जयंतचं केळवण करण्यात आलं. मालिकेत जान्हवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिव्या पुगावकरने मेघन व अनुष्काचं केळवण केलं. ‘AnuMegh चं केळवण’ असं कॅप्शन देत दिव्याने या दोघांबरोबर खास फोटो शेअर केला आहे. “मेघन-अनुष्का मी तुम्हा दोघांसाठी खूप-खूप आनंदी आहे” असं दिव्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, अभिनेता मेघन जाधव सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत विकृत जयंतची भूमिका साकारत आहे. तर, अनुष्का पिंपुटकर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय.
