Lakshmi Niwas Fame Actress Divya Pugaonkar Wedding : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. अखेर साखरपुडा, मेहंदी, संगीत असे सगळे सोहळे पार पडल्यावर दिव्याने अक्षय घरतशी साता जन्माची गाठ बांधली आहे. दिव्या आणि अक्षयचा तिलक समारंभ २०२१ मध्ये पार पडला. तेव्हापासून अभिनेत्रीचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिव्या पुगावकरने जानेवारी महिन्यात तिची लग्नपत्रिका सोशल मीडियावर शेअर करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांना दिली होती. अभिनेत्रीने लग्नपत्रिका शेअर केल्यावर सध्या ती काम करत असलेल्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सहकलाकारांनी दिव्यासाठी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. दिव्या आणि अक्षय यांचं केळवण ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांनी एका रेस्टॉरंटमध्ये साजरं केलं होतं. आता दिव्याच्या लग्नसोहळ्याला सुद्धा हे सगळे कलाकार उपस्थित राहिले होते.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर व तिचा पती हार्दिक जोशी, अनुज ठाकरे, निखिल राजेशिर्के व त्याची पत्नी, तन्वी कोलते, स्वाती देवल, मीनाक्षी राठोड असे सगळे कलाकार दिव्या पुगावकरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत हर्षदा खानविलकर दिव्याच्या ऑनस्क्रीन आईची म्हणजेच ‘लक्ष्मी’ची भूमिका साकारत आहेत. त्यांनी लाडक्या लेकीच्या लग्नात जबरदस्त डान्स केल्याचा व्हिडीओ स्वाती देवलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सिद्धार्थ खिरीड व हर्षदा खानविलकर या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहेत. मालिकेच्या संपूर्ण टीमने दिव्या आणि अक्षयबरोबर फोटो देखील काढले.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/divya_00462a.mp4
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/divya-2.mp4

दिव्याच्या मालिकेतील सहकलाकारांनी या लग्नसोहळ्यात धमाल केल्याचं तसेच या सगळ्या कलाकारांनी नवीन जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्याचं देखील व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिव्याचा नवरा अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi niwas show whole team attend divya pugaonkar wedding harshada khanvilkar dance video viral sva 00