Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लवकरच दोन मोठे ट्विस्ट येणार आहेत. यामध्ये वेंकी आणि जान्हवी कठीण परिस्थितीमुळे वैयक्तिक आयुष्यात मोठे निर्णय घेतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

जान्हवी संपूर्ण कॉलेजमध्ये पहिली येते. यावेळी सत्कार समारंभाला जयंत देखील उपस्थित असतो. कॉलेजमधून घरी जाताना बायकोला सरप्राइज देण्यासाठी जयंत कॉलेजमधील एक बेंच त्यांच्या घरी घेऊन येतो. पण, यामुळे आता जान्हवीच्या आयुष्यात नवीन संकट ओढवणार आहे. जयंत घरी आणलेला बेंच व्यवस्थित निरखून पाहत असतो. इतक्यात मागच्या बाजूला त्याला ‘आय लव्ह यू जानू’ असं लिहिल्याचं पाहायला मिळतं. बायकोच्या बाबतीत आधीच पझेसिव्ह असल्याने जयंत बेंचवरचा मजकूर पाहून भयंकर संतापतो. आता तो जान्हवीला नवीन शिक्षा देणार आहे.

संतापलेला जयंत रागाने कर्कटक घेऊन संपूर्ण बेंचवर ‘जान्हवी लव्ह जयंत’ असं लिही अशी शिक्षा बायकोला देतो. जान्हवी या त्रासाला आणि जयंतच्या नवनवीन शिक्षा भोगून प्रचंड वैतागलेली असते. शेवटी कंटाळून ती आपला हात पुढे करते आणि जयंतला म्हणते, “मी माझ्या हातावरच कर्कटकाने ‘जान्हवी लव्ह जयंत’ असं लिहून घेते.” जान्हवीचा हा निर्णय ऐकून जयंतच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता रागाच्या भरात ती नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

तर, दुसरीकडे आरतीला गुंड उचलून नेतात. रात्रभर तिला कोंडून ठेवलेलं असतं. गुंडांच्या तावडीतून सुटका झाल्यावर आरती खूप रडत असते. आता तिच्याशी लग्न कोण करणार याचा विचार करत असते. इतक्यात वेंकी तिच्याजवळ जातो आणि आरतीला आधार देतो. तुझ्याशी मी लग्न करेन असं तो हातवारे करून आरतीला सांगतो. कोणालाही न सांगता दोघेही लग्नाचा निर्णय घेतात आणि एकमेकांना मिठी मारतात. आता लवकरच मालिकेत आरती आणि वेकींचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लक्ष्मी निवास मालिकेचा हा विशेष भाग १८ मे रोजी ( रविवार ) दुपारी २ आणि रात्री ८:३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.