Late Actor Vikas Sethi Wife Post: लोकप्रिय टीव्ही अभिनेता विकास सेठीचे निधन झाले. शनिवारी (७ सप्टेंबरला) हृदयविकाराच्या झटक्याने त्याची झोपेतच प्राणज्योत मालवली. ४८ वर्षीय विकासच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याची तीन वर्षांची जुळी मुलं बाबाच्या निधनाने पोरकी झाली असून पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विकासची पत्नी जान्हवीने त्याच्याबद्दल भावुक पोस्ट केली आहे.

‘क्योंकि सास भी कभी बहू,’ ‘कहीं तो होगा’ आणि ‘ससुराल सिमर का’ या मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या विकासने चित्रपटांमध्येही काम केलं होतं. त्याने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात करीना कपूरचा मित्र रॉबीची भूमिका केली होती. याशिवाय त्याने दीपक तिजोरीच्या वादग्रस्त ‘उप्स’ चित्रपटात काम केलं होतं. विकास नाशिकला कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेला होता. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. विकासवर सोमवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. विकासच्या निधनानंतर जान्हवीने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता विकास सेठीचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन, शेवटच्या क्षणी ‘अशी’ होती अवस्था, पत्नीने दिली माहिती

व्हिडीओमध्ये विकास गाणं गाताना दिसत आहे. जान्हवीने त्याचा हा व्हिडीओ शेअर करत “माय हिरो.. थँक्यू फॉर एव्हरी मूमेंट”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून तिला धीर देत आहेत. अनेकांनी विकासला श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री फलक नाझने तिला या कठीण काळात सावरण्याचं बळ मिळो, असं म्हटलं आहे.

जान्हवी सेठीने शेअर केलेला व्हिडीओ-

दरम्यान, विकासच्या निधनानंतर जान्हवीने ‘पीटीआय’शी बोलताना त्याच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितलं होतं. “आम्ही नाशिकला माझ्या आईच्या घरी पोहोचलो. त्याला उलट्या झाल्या आणि अतिसारचा त्रास होता. त्याला दवाखान्यात जायचं नव्हतं म्हणून आम्ही डॉक्टरांना घरी बोलावलं. रविवारी सकाळी ६ वाजता मी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याचं निधन झालं होतं. डॉक्टरांनी तपासलं आणि आम्हाला सांगितलं की रात्री झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले,” असं जान्हवी म्हणाली होती.

दोनदा प्रेमविवाह, दोन्हीवेळा अपयश अन् पतींवर शारीरिक शोषणाचे आरोप; आता जुळ्या मुलींसह ‘अशी’ जगतेय अभिनेत्री

विकास सेठीचे नाशिकमध्ये निधन झाले, त्यानंतर त्याचे पार्थिव मुंबईच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. मग सोमवारी (९ सप्टेंबरला) मुंबईत त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी विकासचे कुटुंबीय आणि हितेन तेजवानी, शरद केळकर यांच्यासह विकासचे मित्र व कलाकार उपस्थित होते.