Laughter Chefs season 3 winner: सध्या अनेक रिअॅलिटी शो विविध चॅनेलवर प्रदर्शित होताना दिसतात. टीव्हीबरोबरच विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिअॅलिटी शो प्रदर्शित होतात. सध्या नेटफ्लिक्सवरील लॉकअप, तसेच अमेझॉन प्राइमवरील अलायन्स हे शो सध्या मोठ्या चर्चेत आहेत. आता या सगळ्यात लाफ्टर शेफ(Laughter Chefs Season 3) या शोचे विजेते समोर आले आहेत.

‘लाफ्टर शेफ’ हा शो कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होतो. आतापर्यंत या शोचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. लाफ्टर शेफच्या तिसऱ्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तिसऱ्या सीझनचा ग्रँड फिनाले २६ जुलैला पार पडला. या शोमध्ये अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

तिसऱ्या सीझनमध्ये अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन, अभिषेक कुमार व समर्थ जुरैल, तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा, अली गोनी व जन्नत जुबैर कृष्णा अभिषेक व कश्मिरा शाह, एल्विश यादव व ईशा मालवीय, अर्जुन बिजलानी, निया शर्मा हे कलाकार या शोमध्ये सहभागी झाले होते. करण कुंद्रा व एल्विश यादव, तेजस्वी प्रकाश व अर्जुन बिजलानी, जन्नत जुबैर व अली गोनी या स्पर्धक जोड्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या.

‘ही’ जोडी ठरली Laughter Chefs Season 3ची विजेती

‘लाफ्टर शेफ’च्या तिसऱ्या पर्वाचे विजेते अली गोनी व जन्नत जुबैर ठरले आहे. अली व जन्नत यांना ट्रॉफी मिळाल्यानंतर इतर स्पर्धकही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. जन्नतने सोशल मीडियावर अली व तिचा ट्रॉफीसह एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करीत तिने लिहिले, “लाफ्टर शेफचे विजेते बिट्टूस ठरले आहेत. माझ्या बिट्टीशिवाय हा प्रवास मी कोणाबरोबर करायचा विचारही केला नसता. या प्रवासानं मला आयुष्यभरासाठी एक जीवलग मित्र दिला आणि आम्ही एकत्र जिंकलो. आम्हाला इतकं भरभरून प्रेम दिल्याबद्दल थँक्यू”, असे लिहीत जन्नतने तिच्या भावना व्यक्त केल्या.

शोचे सूत्रसंचालन भारती सिंहने केले; तर परीक्षणाची जबाबदारी शेफ हरपाल सिंह सोखी यांनी पार पाडली. या शोमध्ये स्पर्धकांना हरपाल सिंह सोखी एखादा पदार्थ करण्यास सांगत असत. ते पदार्थ स्पर्धकांना करावे लागत असत. हे करीत असताना स्पर्धकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांच्या मजा-मस्ती, एकमेकांना चिडवणे, वेळप्रसंगी स्वत:चा पदार्थ चांगला व्हावा यासाठी इतरांच्या वस्तू पळवणे, अशा गोष्टी केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर काही वेळा त्यांच्यातील भावनिक क्षणही पाहायला मिळाले.

दरम्यान, लाफ्टर शेफ या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे दिसते. आता या शोचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.