Bigg Boss 18 : सध्या सर्वत्र हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पर्वात एकूण १८ सदस्य सहभागी झाले असून आतापर्यंत दोन जण घराबाहेर झाले आहेत. पहिल्या वीकेंडच्या वारला १९वा सदस्य म्हणून सहभागी झालेल्या गाढवाला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर १५ ऑक्टोबरला वकील गुणरत्न सदावर्ते घराबाहेर झाले.

१५ ऑक्टोबरच्या भागात अचानक गुणरत्न सदावर्तेंना कन्फेशन रुममध्ये बोलवून काही वेळासाठी घराबाहेर जाण्यास सांगितलं. कारण न्यायालयात सदावर्तेसंबंधित काही खटले प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढणं आवश्यक होतं. म्हणून सध्या सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील विविध माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत. याचवेळी जयश्री पाटील यांनी त्यांनादेखील हिंदी ‘बिग बॉस’साठी विचारणा झाल्याचा खुलासा केला.

हेही वाचा –‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा MMS झाला लीक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; उत्तर देत म्हणाली, “एन्जॉय”

‘टेली मसाला’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना सुरुवातीला जयश्री यांना पती गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’मध्ये पाहून कसं वाटलं? याविषयी विचारलं. तेव्हा जयश्री पाटील म्हणाल्या, “मला खरंच भारी वाटलं. जे बाहेर आहेत, तेच ते घरात होते. ते खेळत नसले तरी ते खरे आहेत. ‘बिग बॉस’मध्ये त्यांचं जे काही चालू आहे, ते खूप भारी चालू आहे. मला त्यांच्यात काही फरक वाटत नाहीये.”

पुढे जयश्री पाटील म्हणाल्या, “मला इच्छा होती, यांना थोडा ब्रेक मिळावा. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून यांनी मला आईच्या घरी जाऊ दिलं नाही. जेव्हा केव्हा गेली तेव्हा यांनी लगेच परत घेऊन यायचे. कधी राहू पण दिलं नाही. कारण आम्ही इतकं काम करतो, इतकं व्यग्र असतो. मलाही ‘बिग बॉस’मध्ये बोलावलं होतं. पण, माझी मुलं लहान आहेत. त्यामुळे मी जाऊ शकत नव्हते. म्हणून मी यांना सांगितलं तुम्ही जा.”

हेही वाचा – Video : ‘बिग बॉस १८’मध्ये आला मोठा ट्वीस्ट, गुणरत्न सदावर्तेंनंतर आणखी एक सदस्य घराबाहेर, पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस १८’च्या दुसऱ्या आठवड्यात एकूण १० सदस्य नॉमिनेट झाले होते. अविनाशसह तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक या १० जणांमध्ये एक जण वीकेंडच्या वारला घराबाहेर जाणार आहे.