टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनतात. मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार, याची प्रेक्षकांना कायम उत्सुकता लागलेली असते. काही मालिका अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशा मालिकांपैकी एक म्हणजे नवरी मिळे हिटरलला ही मालिका आहे. आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला, ज्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

“घरच्या आनंदात मिठाचा खडा टाकणाऱ्याला या घरात जागा नाही”

‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला एजे लीलाला सांगतो की, ज्यांनी कोणी सापगोळ्या धुपाच्या जागी ठेवल्या, त्या व्यक्तीला माझ्यासमोर उभं कर. त्यानंतर श्वेता आणि लीला किचनमध्ये असल्याचे पाहायला मिळते. श्वेता लीलाला म्हणते की, प्रसादाची खीर असेल ना ती तूच कर. त्यानंतर ती खीर आजी खात असून, त्यांना ठसका लागल्याचे दिसत आहे. त्यावेळी श्वेता म्हणते की, खारट लागतेय ना खीर? त्यानंतर आजी म्हणतात की, घरच्या आनंदात मिठाचा खडा टाकणाऱ्याला या घरात जागा नाही.

lakahat ek aamcha dada
Video: “माझ्या पायाशी…”, सिद्धार्थचा खरा चेहरा समोर येताच तुळजाचा निर्धार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवीन प्रोमो पाहा
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Bigg Boss Marathi Season 5 Suraj chavan Taunt to Abhijeet Sawant
Video: “तो आता गजनी झालाय”, निक्की आणि अभिजीतचा खेळ पाहून सूरजचा टोमणा, नेमकं काय घडलं? पाहा
Navri Mile Hitlarla
Video: दारुच्या नशेत लीला एजेला म्हणाली, “तुम्ही फक्त खडूस नाही तर…”; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?
Nikki Tamboli- Arbaz Patel Relationship is Over Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi: “सगळं संपलं,” अरबाजबद्दल आईने सांगितलं ते ऐकून भडकली निक्की, त्याचे कपडे फेकले अन्… पाहा VIDEO
Navri Mile Hitlarla
Video: ‘क्रूझवर प्रेमाच्या लाटा उसळणार, लीला प्रेमाची कबुली देणार का?’, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?
Bigg Boss Marathi Arbaz Patel Elimination
अरबाज झाला Eliminate! निक्की ढसाढसा रडली…; Bigg Boss Marathi च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant wears a saree watch video
Video: अभिजीत सावंतला साडी नेसवून केला भन्नाट मेकअप, अरबाज म्हणाला, “छम्मक छल्लो”

आजीने असे म्हणताच सरस्वती म्हणते की, हे जे काही केलंय ना ते सगळं श्वेतानं केलंय. सरस्वतीने असे म्हणताच श्वेता तिला विचारते की, तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? लीला म्हणते की, माझ्याकडे आहेत पुरावे. त्यानंतर ती तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सगळ्यांना दाखवते. हे पाहिल्यानंतर एजे म्हणतो की, हिला या घरात जागा नाही. त्यानंतर लक्ष्मी श्वेताला हाताला धरून बाहेर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, ‘श्वेताला घराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार..!’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे श्वेता आणि एजे यांचे लग्न ठरलेले असते. मात्र, रेवतीला किडनॅप करून, एजेबरोबर लग्न करण्याची धमकी दिली जाते. तसे केले, तरच रेवतीचा जीव वाचू शकतो, असे तिला सांगितले जाते. त्यामुळे लीला श्वेताला बेशुद्ध करते आणि तिच्या जागी स्वत: मंडपात बसते. एजे आणि लीलाचे अशा प्रकारे लग्न होते. श्वेता ही लक्ष्मीची नातेवाईक असल्याने ती त्यांच्या घरी राहायला येते. एजे आणि लीलाचे लग्न मोडावे यासाठी ती सतत प्रयत्न करताना दिसते. त्याबरोबरच श्वेता ही लक्ष्मी, सरस्वती यांच्या मदतीने लीलाला त्रास देत असते. आता मात्र श्वेताला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: आर्याने निक्कीला मारलं ते दृश्य प्रेक्षकांना का दाखवलं नाही? रितेश देशमुख कारण सांगत म्हणाला, “घरात…”

आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.