Leeza Bindra Post after Arbaz Patel Elimination: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या (Bigg Boss Marathi 5) पर्वात रविवारी आठव्या आठवड्याचे एलिमिनेशन झाले. वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अरबाज पटेल व निक्की तांबोळी हे स्पर्धक मागील आठवड्यात एलिमिनेट झाले होते. त्यापैकी वर्षा, जान्हवी, सूरज हे स्पर्धक सेफ झाले आणि निक्की व अरबाज (Arbaz Patel Nikki Tamboli) डेंजर झोनमध्ये होते. शेवटी निक्की सेफ झाली आणि अरबाज पटेल घराबाहेर पडला.
अरबाज पटेलला प्रेक्षकांची कमी मतं मिळाली, त्यामुळे तो घराबाहेर जाणार असल्याची घोषणा बिग बॉसने केली. यानंतर निक्की हमसून हमसून रडू लागली. अरबाजला मिठी मारून निक्की बराच वेळ रडत होती. तुझ्याविना मी या घरात राहून काय करू, असं म्हणत ती बिग बॉसला विनंती करत होती की त्यांनी अरबाजला संधी द्यावी. अरबाज एलिमिनेट झाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड लीझा बिंद्राने एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीने लक्ष वेधून घेतले आहे.
अरबाज घराबाहेर पडल्यावर त्याने केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये निक्कीबरोबरचे काही भावनिक फोटो शेअर केले होते. दुसरीकडे आता त्याची गर्लफ्रेंड लीझाच्या पोस्टची चर्चा होत आहे. ‘तू दुःखी असतेस तेव्हा काय करतेस’ असं लिहिलेला एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. त्या पुढे ती काय करते ते तिने दाखवलं आहे. यात ती नमाज पठण करताना दिसत आहे. लीझाने अरबाजचं थेट नाव घेत ही पोस्ट केलेली नाही, पण अरबाजने शेअर केल्यानंतर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – “बिग बॉसने निक्कीला गुलीगत धोका…”, अरबाज Eliminate झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस; वाचा भन्नाट प्रतिक्रिया
लीझाचा व्हिडीओ-
बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज यांच्यात जवळीक वाढली. अरबाजने घरात आर्याशी बोलताना त्याची बाहेर गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं होतं. तसेच एका एपिसोडमध्ये ‘दुर्गा’ मालिकेचे कलाकार आले होते, तेव्हाही अरबाजने तो बाहेर कमिटेड असल्याचं म्हटलं होतं. त्याची (Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra) गर्लफ्रेंड लीझा हिनेही सोशल मीडियावर पोस्ट करत अरबाजबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं होतं. पण अरबाज मात्र निक्कीबरोबर घराबाहेर गेल्यावरही नातं टिकवणार असल्याचं म्हटलाय, त्यामुळे या प्रेमाच्या त्रिकोणाचं पुढे काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.