Madhavi Nemkar Reveals Her 12 Year Old Son’s Strict Diet & Fitness Routine : फिटनेस, हेल्थ, डाएट आणि डेली रूटीन हे शब्द हल्ली सरास कानावर पडत असतात. सेलिब्रिटींमध्ये तर या गोष्टी चर्चेचा विषय असतात. प्रत्येक कलाकार स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि स्क्रीनवर छान दिसण्यासाठी मेहनत घेत असतात. विविध डाएट प्लॅन फॉलो करत असतात. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर यापैकीच एक आहे.

माधवी निमकर अभिनयाव्यतिरिक्त तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती फिटनेस फ्रीक असून ती डाएट, योगा या सर्व गोष्टी नियमितपणे करत असते. माधवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि यामार्फत तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती शेअर करत असते. ती अनेकदा योगा करताना, विविध पदार्थ बनवतानाचे आणि फिटनेस रिलेटेड फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते.

माधवी तिचा मुलगा रूबीनबरोबरचे फोटो व व्हिडीओसुद्धा पोस्ट करत असते. दोघांचे फोटो व रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता तिनं तिच्या मुलाबद्दल सांगितलं आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिनं तिचा मुलगा अवघ्या लहान वयात डाएट करतो असं म्हटलं आहे. माधवीचा मुलगा रूबीन आता सहावीत आहे. तो आतापासूनच साखरयुक्त पदार्थ खाणं टाळत असल्याचं तिनं यामधून सांगितलं आहे. मुलाबद्दल माधवी नेमकं काय म्हणाली आहे याबद्दल जाणून घेऊयात…

Award Banner

माधवी निमकरचा मुलगा अवघ्या लहान वयात करतो डाएट

माधवी निमकर स्वत: तर फिटनेस फ्रीक आहेच. ती आरोग्याची खूप काळजी घेत असून जेवणाच्या वेळा नियमीतपणे पाळते, दररोज व्यायाम करते, योगा करते, गोड फार खात नाही. तिच्या आहारात ठरावीक गोष्टी असतात असं तिनं अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे. पण, आता तिचा मुलगासुद्धा डाएट करतो आणि काही पदार्थ खाणं टाळतो. परंतु, ती त्याला आतापासून डाएटची गरज नाहीये असं सांगते असं ती नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे.

माधवी नेमकरनं दिला सल्ला

माधवी म्हणाली, “मी त्याला काहीच शिकवायला जात नाही. की डाएट कर वगैरे. त्याचं वय आहे खाण्या-पिण्याचं. पण, त्याचं अस म्हणणं आहे की जास्त साखरयुक्त पदार्थ नको. यात खूप साखर आहे वगैरे असं तो म्हणत असतो. एक पुरणपोळी खालली की म्हणतो नको खूप गोड आहे. तेव्हा मी त्याला “खा तू गपचूप”. तुला खूप खेळायचं आहे आता. आता कशाला डाएट करतोय. त्यावर तो नको माझे मित्र पण सगळे बारीक आहेत. मलासुद्धा बारीक राहायचं आहे. त्याला मी काहीही शिकवलेलं नाहीये. मी फक्त एकच सांगते की रूबीन साखरेचं प्रमाण जास्त ठेवू नकोस. मोठी माणसं असो किंवा लहान मुलं ती गोष्ट कोणासाठीच चांगली नाहीये.”

अभिनेत्री मुलाबद्दल पुढे म्हणाली, “त्याला आता कळायला लागलंय की साखर जास्त खाल्ल्याने वजन वाढतं. मग त्याने स्वत:हून कमी केली. तो मला आई कॅल्शियम कशामध्ये जास्त असतं. प्रोटीन कशामध्ये जास्त असतं. मांसाहार करायचा नसेल तर मग व्हेजमधून मला प्रोटीन कशामधून मिळू शकतं. हे प्रश्न त्याला आता पडत आहे. मला आवडतं की तो हेल्थ फ्रीक आहे. वाटेल तसं कधीही काहीही खात नाही.”

माधवी पुढे म्हणाली, “त्याला ज्यूस फार आवडत नाही. मी बिटरूट, गाजर टाकून ज्यूस बनवते आणि मला वाटतं की ज्यूस बनवल्या बनवल्या प्यायलं पाहिजे. मग तो कोणताही ज्यूस असो. पण, त्याला त्याच्या आवडीचेच ज्यूस लागतात. सफरचंदाचे किंवा संत्र्याचे. त्याला माझ्या डाएटमुळे आपण चांगलं खाल्लं पाहिजे याची सवय लागली आहे.