कलाकार त्यांच्या कलाकृतींबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अनेकदा कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चित्रपटाचे, मालिकेचे प्रमोशन करताना दिसतात; तर कधी त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. बऱ्याचदा विनोदी रीलच्या माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. आता अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar)ने शेअर केलेला एक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

मधुराणी प्रभुलकर सध्या काय करते?

मधुराणी प्रभुलकरने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये ती झोपाळ्यावर निवांत बसल्याचे दिसत आहे. या रीलला तिने कॅप्शन देत लिहिले, “मी सध्या काय करतेय…? ‘चिल’टाकतेय.” या रीलला आपण आपले संपूर्ण आयुष्य चांगल्या वेळेची वाट पाहण्यात घालवतो, पण सध्याचा जो वेळ आहे तोच चांगला हे कोणाला माहितच नाही. अशा आशयाचा आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे मधुराणी ‘आई कुठे काय करते’ नंतर सध्या आराम करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
aai kuthe kay karte fame abhishek and ankita reunion
‘आई कुठे काय करते’ : अभिषेक-अंकिता आठवतात का? अभिनेत्याच्या कॅफेला दिली भेट, नेटकरी म्हणाले, “तुमची जोडी…”
इन्स्टाग्राम

मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “तुमच्या शोची खूप आठवण येते. आता जेवण करताना काय पाहायचे हे आम्हाला कळत नाही. आम्ही तुमच्या शोला अगदी सुरुवातीपासून फॉलो करत होतो”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मधुराणी तुझं बरोबर आहे, आराम कर. पण, आम्ही तुझ्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहोत”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप छान”, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

मधुराणी प्रभुलकर ही स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली होती. मधुराणीने साकारलेले हे पात्र घराघरात पोहोचले. सोशिक, घराला सर्वस्व मानणारी, कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारी अशी अरुंधती वेळ आल्यानंतर तितक्याच धैर्याने, संयमाने परिस्थितीला सामोरी जाते. समाजात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करते व कुटुंबालादेखील जपते. ही मालिका प्रेक्षकांना फार आवडली असल्याचे पाहायला मिळाले. पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

हेही वाचा: “कुबूल है”! ‘पंचायत’ फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाला…

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यावेळी अनेक मुलाखती, सोशल मीडियावरील व्हिडीओ या माध्यमातून मालिकेतील सर्वच कलाकार व्यक्त होताना दिसले. मालिकेला निरोप देताना भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. आता हे कलाकार कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, आपल्या आवडत्या कलाकारांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.

Story img Loader