छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही सातत्याने चर्चेत असते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत त्यांच्या संपर्कात राहत असते. पण आता तिने काही दिवसांसाठी या मालिकेतून सुट्टी घेतली असल्याचं सांगितलं आहे. आता लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. या निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. अनेक कलाकार शूटिंगमधून ब्रेक घेऊन त्यांच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवत आहेत. त्याचप्रमाणे 'आई कुठे काय करते!' मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरदेखील तिच्या लेकीबरोबर व्हेकेशन मोडवर गेली आहे. आणखी वाचा : “आता पूर्णविराम देण्याची वेळ आलीये…” म्हणणाऱ्या सुव्रत जोशीचे पत्नी सखी गोखलेने मानले आभार, म्हणाली… हेही वाचा : “प्रत्येकीला अरुंधतीमध्ये….”, ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीची भावूक पोस्ट मधुराणीने नुकतेच तिचे आणि तिच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात ती शूटिंगमधून छोटासा ब्रेक घेऊन तिच्या मुलीबरोबर सुट्ट्यांचा आनंद उपभोगताना दिसतेय. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, "मदर डॉटर व्हेकेशन टाईम." मालिकेमध्ये साडीमध्ये दिसणारी मधुराणी या फोटोंमध्ये एकदम मॉडर्न लूकमध्ये दिसतेय. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.