Madhuri Dixit : करिअरच्या शिखरावर असताना ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केलं. १९९९ मध्ये या दोघांचा विवाहसोहळा कॅलिफोर्निया येथे पार पडला होता. माधुरीला ९० च्या दशकातील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखल जातं. त्या काळात कित्येकांची माधुरी क्रश होती. त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी समोर आल्यावर अनेकांचे हार्टब्रेक झाले होते.

‘माधुरीचं लग्न झाल्यावर खूप वाईट वाटलं’, असं वक्तव्य आजवर अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा केलेलं आहे. याबाबत सोनाली बेंद्रेने सुद्धा माधुरीला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रश्न विचारला.

सोनाली म्हणाली, “तुमचं जेव्हा लग्न झालं…तेव्हा खूप लोकांचे हार्टब्रेक झाले.”

यावर माधुरी हसली अन् पुढे लाजत म्हणाली, “म्हणून मी अशा माणसाशी लग्न केलं, जो HeartMend करतो.” म्हणजेच डॉ. श्रीराम नेने हे हार्ट सर्जन आहेत, त्यामुळे हृदयावर उपचार करणाऱ्या, हृदय जोडणाऱ्या व्यक्तीशी मी लग्न केलं, असं माधुरीने सांगितलं. यानंतर ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एकच हशा पिकला. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

माधुरी दीक्षित लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती. यानंतर ती फक्त शूटिंगनिमित्त भारतात यायची. पण, २०११ मध्ये माधुरी डॉ. नेनेंसह कायमस्वरुपी भारतात परतली.