Mahabharat Cast Unknown Facts: रामानंद सागर यांच्या ‘महाभारत’, ‘रामायण’ या दोन्ही मालिका प्रचंड गाजल्या. त्यांची लोकप्रियता आजही तितकीच असल्याचे पाहायला मिळते. असे म्हटले जाते की, या मालिका जेव्हा प्रदर्शित व्हायच्या तेव्हा रस्त्यांवर शुकशुकाट असायचा. त्या काळात या दोन्ही मालिकांनी दूरदर्शनवर राज्य केले होते. दोन्ही मालिकांतील कलाकारांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.
‘महाभारत’मधील कलाकारांचा चाहतावर्ग मोठा आहे. या मालिकेतील काही कलाकार आजही विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, काही कलाकारांना अपयशाचा सामना करावा लागला.
१. नाजनीन
अभिनेत्री नाजनीनने ‘महाभारत’मध्ये कुंती ही भूमिका साकारली होती. तिची ती शेवटची भूमिका होती. त्यानंतर अभिनेत्री कोणत्याही भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. त्याआधी मात्र, अभिनेत्रीने विविध चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
आयएमडीबीनुसार, नाजनीन सध्या अध्यात्मावर लक्ष केंद्रित करीत आहे. तसेच, अभिनेत्रीला आता पुन्हा अभिनय क्षेत्रात परत यायचे नाही. तसेच, तिने स्वत:चे नाव बदलले आहे. नाजनीन मर्चंट, असे तिचे नाव आहे.
२. चांदनी शर्मा
अभिनेत्री चांदनी शर्माने महाभारत या मालिकेत राणी सुदेष्णा ही भूमिका साकारली होती. उत्तराच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री दिसली होती. मात्र, सध्या अभिनेत्री अभिनय क्षेत्रातून गायब झाली आहे. तसेच, तिच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
३. रोमा मानेक
अभिनेत्री रोमा मानेकही महाभारतातून लोकप्रिय ठरली होती. अभिनेत्रीने ‘महाभारत’मध्ये राजा पांडूची दुसरी पत्नी आणि नकुल-सहदेवच्या आईची भूमिका साकारली होती.
४. संजीव चित्रे
अभिनेता संजीव चित्रेही सध्या प्रसिद्धीझोतापासून दूर आहे. त्याने सहदेवची भूमिका साकारली होती. सध्या अभिनेता काय करतो, तसेच कुठे राहतो याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
५. मयूर राज वर्मा
अभिनेता मयूर राज वर्माने मालिकेत अभिमन्यू ही भूमिका साकारली होती. मात्र, अभिनेत्याने अनेक वर्षांआधी अभिनय सोडला आहे. सध्या तो अमेरिकेत राहतो. तिथे त्याच्या मालकीचे हॉटेल आहे. मयूर ७० च्या दशकातील सर्वांत महागडा बालकलाकार होता. त्याला ज्युनियर अमिताभ बच्चन, असेही म्हटले जात होते.
