टीव्ही मालिका ‘महाभारत’मध्ये ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेते गुफी पेंटलची यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि अचानक त्यांची प्रकृती जास्त बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.




अभिनेत्री टीना घई हिनेही गूफी पेंटल यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. गुफी यांचा फोटो शेअर करत टीनाने लिहिलं, “गुफी पेंटलजी संकटात आहेत. ते बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करा.” टीना यांच्या पोस्टवर युजर्स कमेंट करून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करीत आहेत. दरम्यान, गुफी पेंटल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
गुफी पेंटलच्या यांनी टीव्हीसोबतच चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारून त्यांना ओळख मिळाली. त्याच पात्रामुळे त्यांना घरोघरी ओळखलं जातं. त्यांचा मालिकेत अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल कळताच चाहते त्यांनी लवकर बरं व्हावं, यासाठी प्रार्थना करीत आहेत.