‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे वनिता खरात नावारुपाला आली. वनिताने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. २ फेब्रुवारीला वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह विवाहबंधनात अडकली.दोघंही सुखी संसारामध्ये रमले आहेत. वनिता सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते, नुकतेच तिने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. सोशल मीडिया माध्यमाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. हिंदीप्रमाणे मराठी सेलिब्रेटीदेखील सोशल मीडियावर सक्रीय असतात. कित्येकदा कलाकरांना ट्रोल केलं जातं यावरच वनिताने सकाळच्या पॉडकास्ट सत्रात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती असं म्हणाली, "मला अजिबात ट्रोलिंगचा त्रास होत नाही. मी एकदा पोस्ट शेअर केली की त्याकडे पुन्हा बघतदेखील नाही. त्यावर किती लाईक्स कमेंट्स आल्या हे बघत नाही." “…तर मी काम करत नाही” शरद केळकरचं मोठं वक्तव्य; पत्नीचा उल्लेख करत म्हणाला… ती पुढे म्हणाली, "कोणी काय कमेंट केली आहे हे बघत नसल्याने मला फरक पडत नाही. मला माहिती आहे मी केलेली गोष्ट बरोबर आहे त्याच्यावर इतरांचं मत जाणून घेणं मला आवश्यक वाटत नाही." अशी प्रतिक्रिया तिने दिली. वनिता खरात नुकतीच ’सरला एक कोटी’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार भोजने व अभिनेत्री ईशा केसकर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून याचे दिग्दर्शन नितीन सुपेकर यांनी केलं होतं.