maharashrachi hasyajatra fan edit kohli family video namrata shambherao share post | Loksatta

Video: “मी अवली लवली…” हास्यजत्रेतील ‘कोहली’ फॅमिलीचा चाहत्याने एडिट केलेला भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कोहली फॅमिलीचा चाहत्याने एडिट केलेला Video Viral

Video: “मी अवली लवली…” हास्यजत्रेतील ‘कोहली’ फॅमिलीचा चाहत्याने एडिट केलेला भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील व्हिडीओ चाहत्याने एडिट केला आहे. (फोटो: सोनी मराठी)

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरांत हा कार्यक्रम अगदी आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेतील विनोदवीर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. या शोमधील हास्यवीरांवरही प्रेक्षक भरपूर प्रेम करतात.

हास्यजत्रेतील अनेक डायलॉग हे प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. गौरव मोरेच्या “आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” किंवा समीर चौगुलेंच्या “शिवाली हे खरंय का” या डायलॉगशिवाय स्किटमध्ये मजाच येत नाही.

हेही वाचा>> विक्रम गोखले यांच्या निधनाने बिग बी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले “भूमिका निभावली आणि हा मंच…”

हास्यजत्रेच्या स्किटमधील कोहली फॅमिलीही प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटमधील सगळ्या पात्रांची नावे व संवादाचा शेवटही ‘ली’ या अक्षरानेच होतो. समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव व प्रियदर्शनी हे कलाकार अचूक टायमिंग साधत विनोदनिर्मिती करतात.

हेही वाचा>> “मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर

हेही वाचा>> ‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिजच्या निर्मात्याबरोबर राजामौली काम करणार? म्हणाले “मला हॉलिवूडमध्ये…”

कोहली फॅमिलीची भूरळ हास्यजत्रेच्या चाहत्यालाही पडली आहे. एका चाहत्याने कोहली फॅमलिच्या स्किटचा हा व्हिडीओ म्युझिक टाकून एडिट केला आहे. नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. कोहली फॅमिलीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 18:28 IST
Next Story
Video : आधी अपूर्वा नेमळेकरशी केली मैत्री, आता तिच्याशीच विकास सावंतचं वैर, किरण मानेंनेही त्यालाच केलं टार्गेट अन्…