‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. समीर चौघुले, नम्रता संभेराव, समीर चौघुले, वनिता खरात यांसारख्या कलाकारांचा तर चाहतावर्ग खूप मोठा आहे. नुकतंच या कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री चेतना भटने एक पोस्ट शेअर केली. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

सध्या मराठी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरच्या ‘फुलराणी’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने ‘फुलराणी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या सेटवर हजेरी लावली. यानिमित्ताने अभिनेत्री चेतना भटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने तिच्या पतीबरोबरचा खास फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : “मी प्रियदर्शनीला ओळखत नव्हतो, ती हास्यजत्रेत…” सुबोध भावेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित
What Sanjay Raut Said About Amit Shah?
“अमित शाह देशाचे गृहमंत्री नसते तर जय शाह… “, घराणेशाहीच्या आरोपावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

“MHJ चा जावई MHJ मधे फुलराणी च्या प्रोमोशन साठी… मला नेहमी सपोर्ट करणारा आणि ज्याचा मला आणि मला ज्याचा नेहमी अभिमान आणि कौतुक असतं असा माझा नवरा.. मला शालू character दिल्या बद्दल खूप खूप आभार”, अशी पोस्ट चेतना भटने केली आहे.

आणखी वाचा : “शेवटचा हॅशटॅग महत्त्वाचा…” ओंकार राऊतच्या ‘त्या’ पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट चर्चेत

‘फुलराणी’ या चित्रपटात चेतना भटचा पती मंदार चोळकरने मोठी भूमिका बजावली आहे. मंदार हा प्रसिद्ध गीतकार आहे. त्याने या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. त्याची ही गाणी सर्वत्र हिट होताना दिसत आहेत.

दरम्यान ‘फुलराणी’ या चित्रपटात सुबोध भावे विक्रम ही भूमिका साकारताना दिसत आहे. तर प्रियदर्शनी ही शेवंता तांडेल हे पात्र साकारत आहे. गेल्या २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला.