Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाचे चाहते आहेत. निखिल बने, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश शिवलकर, मंदार, ओंकार राऊत, रोहित माने या सगळ्या कलाकारांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे एक नवीन ओळख मिळाली. नुकताच या सगळ्यांनी मिळून जबरदस्त बाल्या डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कोकणात सणवाराला गावची सगळी मंडळी एकत्र जमून बाल्या डान्स करतात. "राधा ही मथुरेच्या बाजाराला चालली…" ही गवळण कोकणात विशेष लोकप्रिय आहे. यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील ( Maharashtrachi Hasya Jatra ) सगळ्या कलाकारांनी मिळून जबरदस्त डान्स बाल्या डान्स केला आहे. हेही वाचा : Video: युरोपहून एका महिन्याची सुट्टी एन्जॉय करून परतले पतौडी कुटुंब, धाकट्या लेकाबरोबर मस्ती करताना दिसला सैफ अली खान 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांचा भन्नाट डान्स ( Maharashtrachi Hasya Jatra ) "गणपती जवळ येत आहेत… तर एक डान्स झालाच पाहिजे" असं कॅप्शन देत निखिल बनेने हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हास्यजत्रेचे सगळे कलाकार नुकतेच वनिता खरातचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फिरायला गेले होते. यादरम्यान या कलाकारांनी हा बाल्या डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये वनिताचा नवरा सुमीतची झलक देखील पाहायला मिळत आहे. हेही वाचा : Navari Mile Hitlerla : लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमात लीलाने घेतला भन्नाट उखाणा, म्हणाली, “आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते…” वनिता खरातने या व्हिडीओवर 'येडी पोरं' अशी कमेंट आहे. तर, अभिनेत्री पूजा सावंतने या व्हिडीओवर कमेंट करत 'बेस्ट' म्हटलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "कोकणी माणूस कुठेही स्वर्ग निर्माण करू शकतो", "प्युअर कोकणी", "नाद नाही करायचा कोकणी ठेका. सुपर से उपर" अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार नवी पौराणिक मालिका! पार पडला मुहूर्त सोहळा; महेश कोठारे म्हणाले, “याद्वारे महाराष्ट्रातील…” महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार ( Maharashtrachi Hasya Jatra ) दरम्यान, निखिल बनेने शेअर केलेल्या या डान्स व्हिडीओला २४ तासांच्या आत ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी हास्यजत्रेच्या या सगळ्या कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.