scorecardresearch

“ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं…”, सिडनी दौऱ्यावर जाणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार, म्हणाले…

अमेरिकेनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचा सिडनी दौरा! केव्हा व कुठे होणार प्रयोग? जाणून घ्या…

maharashtrachi hasya jatra australia sydney tour live
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार जाणार सिडनी दौऱ्यावर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. मे २०२३ मध्ये हे सगळे हास्यवीर अमेरिका दौऱ्यावर गेले होते. परदेशातही या कलाकारांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आता हास्यजत्रेतील कलाकारांच्या पुढच्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. आता कलाकारांचा पुढचा दौरा केव्हा व कुठे असणार जाणून घेऊयात…

हास्यजत्रेच्या कलाकारांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत पुढच्या दौऱ्याबाबत माहिती दिली. हे सगळे कलाकार पुढच्या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीला जाणार आहेत. समीर चौघुले याबद्दल लिहितात, “तुमची लाडकी महाराष्ट्राची हास्यजत्रा सिडनीमध्ये…आता प्रतीक्षा संपली. आम्ही ९ मार्च २०२४ रोजी सिडनीत तुम्हाला भेटायला येतोय.”

namrata sambherao shared photo with vanita kharat and onkar bhojane
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, वनिता खरात आणि ओंकार भोजने पुन्हा एकत्र, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष
mira jagannath video from landon
वाघनखे, महाराष्ट्र सरकारचे बॅनर्स अन्…, मराठी अभिनेत्रीने शेअर केला लंडनच्या रस्त्यांवरील व्हिडीओ
rohit mane
“…तर मी गावाला शेती करत असतो”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचे वक्तव्य चर्चेत
vishakha subhedar
“…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

हेही वाचा : ‘सिटी ऑफ ड्रीम्स’नंतर प्रिया बापटच्या हाती मोठा प्रोजेक्ट! बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्याबरोबर करणार काम, म्हणाली…

सिडनी दौऱ्याविषयी पृथ्वीक प्रताप म्हणतो, “ऑस्ट्रेलियाने इथे येऊन आपल्याला हरवलं आता आम्ही तिथे जाऊन त्यांची मनं जिंकणार!” नेटकऱ्यांनी या पोस्टवर भन्नाट कमेंट्स करत “ऑस्ट्रेलियाला खूप हसवा आणि आपला वर्ल्डकप परत घेऊन या” अशा कमेंट्स केल्या आहेत.

prithvik
पृथ्वीक प्रताप

हेही वाचा : “…आणि माझ्या आयुष्यात राजकुमार आला”, नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाली, “त्याने मला…”

दरम्यान, पुढच्या वर्षी ९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता (ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार) UNSW विज्ञानगृहात हा प्रयोग पार पडणार आहे. अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल विनोदवीरांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasya jatra australia sydney tour live prithvik pratap and samir choughule shared update sva 00

First published on: 21-11-2023 at 16:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×