‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीराने दिली गुडन्यूज, बाळाचा व्हिडीओ केला शेअर | Maharashtrachi Hasya Jatra comedian rohit mane welcome Nephew share good news video viral nrp 97 | Loksatta

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीराने दिली गुडन्यूज, बाळाचा व्हिडीओ केला शेअर

त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीराने दिली गुडन्यूज, बाळाचा व्हिडीओ केला शेअर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारे अनेक कलाकार यात सहभागी झाले आहेत. नुकतंच या कार्यक्रमातील एक विनोदवीराने गुडन्यूज दिली आहे. त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, रोहित माने, दत्तू मोरे यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा शो म्हणून त्याला ओळखले जाते. या कार्यक्रमातील रोहित माने या कलाकाराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

रोहित माने याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एका बाळाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ते बाळ गोड हसताना दिसत आहे. याला कॅप्शन देत त्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. “या गोड बाळाचा मामा झालोय मी”, असे त्याने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. त्या बरोबर त्याने मामा-भाचा, प्रेम, लव्ह असे हॅशटॅगही शेअर केले आहेत.

दरम्यान रोहित हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आला. या कार्यक्रमामुळे त्याला सर्वत्र ओळख मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून तो विनोदी अभिनय करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 16:54 IST
Next Story
“अक्कलकोटला गेल्यानंतर मला पहिल्यांदा…” ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव