scorecardresearch

Video : “गौरव मोरेच्या पायात खिळा घुसला होता, पण…” निर्मात्याने सांगितला ‘तो’ प्रसंग

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून त्याला ओळखले जाते.

gaurav more
गौरव मोरे

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. याच कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला विनोदवीर अभिनेता गौरव मोरे हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून त्याला ओळखले जाते. गौरवने खडतर परिश्रम करत यशाचे शिखर गाठले आहे. नुकतंच एका लेखक आणि निर्मात्याने गौरव मोरेचा किस्सा सांगितला आहे.

मराठी नाटक, चित्रपट यासारख्या अनेक ठिकाणी अभिनयाची छाप उमटवणाऱ्या गौरव मोरेने आतापर्यंत अनेक छोटी मोठी काम केली आहेत. लेखक आणि निर्माता निखिल पालांडे यांनी इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो गौरव मोरेबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी त्याच्याबरोबर मंचावर अनेक कलाकार उपस्थित असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : “मी लायक आहे की नाही…”, अभिनेता गौरव मोरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या व्हिडीओत निखिल हा गौरवच्या काही आठवणी सांगत आहे. “मी आणि अश्विनी मघाशी गप्पा मारत होतो. त्यावेळी अश्विनी मला म्हणाली की, तेव्हा गौरव मोरेच्या पायात खिळा घुसला होता. पण तरीही रक्तबंबाळ पायाने त्याने पूर्ण दर्पणचे अँकरिंग केले होते. आता इथे उपस्थित असलेले सर्वजण याचे साक्षीदार आहे. त्यावेळी या सर्वांनी डान्स परफॉर्मन्सही होता. ही घटना किंवा हा प्रसंग खरंच खूपच भावूक करणारा आहे.” असे त्याने या व्हिडीओत म्हटले. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा : “मी प्रियदर्शनीला ओळखत नव्हतो, ती हास्यजत्रेत…” सुबोध भावेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान गौरवने महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून अभिनय करायला सुरुवात केली आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरव घराघरात पोहोचला. गौरवने ‘संजू’, ‘कामयाब’, ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात देखील काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 11:53 IST