scorecardresearch

“…आणि माझ्या आयुष्यात राजकुमार आला”, नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाली, “त्याने मला…”

लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

namrata sambherao shares romantic post for her husband
वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी खास पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे नम्रता संभेराव. कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सिनेक्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवल्यावर नम्रताने वैयक्तिक आयुष्यात २०१३ मध्ये योगेश संभेराव यांच्याशी लग्न केलं. तिचे पती अभिनयसृष्टीत कार्यरत नाहीत. दोघांचाही प्रेमविवाह झालेला आहे.

नम्रता आणि योगेश एकत्र कॉलेजमध्ये होते. त्यानंतर सोशल मीडियामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात होऊन अभिनेत्रीने २०१३ मध्ये योगेश यांच्याशी लग्न केलं. यानंतर ६ वर्षांनी नम्रताने रुद्राजला जन्म दिला. आज नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा देत नवऱ्यासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

apurva nemlekar shared emotional post for late brother
भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “तुला गमावण्याचं दुःख…”
mugdha prathamesh
प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायनला ‘या’ नावाने मारतो हाक, गायकाने शेअर केलेल्या स्टोरीने वेधलं लक्ष
shreya bugde ganpati post
लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे भावूक; म्हणाली, “पाच दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना…”
Madhura deshpande
‘शुभविवाह’ फेम मधुरा देशपांडेने सांगितला नवऱ्याबरोबरच्या पहिल्या डेटचा भन्नाट किस्सा; म्हणाली….

हेही वाचा : शाहरुख खानच्या लेकाला पाहून दीपिका पदुकोणने केलं असं काही…; दोघांचं बॉण्डिंग पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘जवान’मधील ‘तो’ सीन

नम्रता तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगेश! मग कुठूनसा येईल राजकुमार…सफेद घोड्यावर होऊन स्वार…”ती फुलराणी ” मधलं हे स्वगत अनेकदा अनेक जणींनी सादर केलंय मी ही केलं आणि खरोखरीच माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला. माझ्या सुखात तो त्याचं सुख पाहणारा…सोबती ह्या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा… त्याने मला दिलेलं प्रोत्साहन, कौतुक, प्रेम, आधार, मला कायम ताज तवानं ठेवतं आय लव्ह यू योगेश… कायम हसत राहा आनंदी राहा. तुझ्या सगळ्या इच्छा स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना”

हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकले ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक; साकारतायत ‘ही’ भूमिका

नम्रताने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाविश्वातील तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समीर चौघुले यांनी “दोघांना खूप प्रेम” तर, स्वानंदी टिकेकरने या फोटोवर “किती सुंदर लिहिलं आहे…एकदम खरंय!!” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर केल्या आहेत. याशिवाय ऋतुजा बागवे, रसिका वेंगुर्लेकर, सुप्रिया पाठारे, चेतना भट या कलाकारांनी सुद्धा नम्रताने योगेश यांच्यासाठी लिहिलेल्या पोस्टचं कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame namrata sambherao shares romantic post for her husband yogesh sambherao sva 00

First published on: 21-11-2023 at 12:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×