‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरला सुद्धा हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. अलीकडेच अभिनेत्रीने हास्यजत्रेतील सहकलाकार आणि परीक्षकांचं कौतुक करत त्यांच्याविषयी काही खुलासे केले आहेत.

हेही वाचा : Video : “ऐका हो ऐका!”, विद्या बालनने मराठमोळ्या अंदाजात केली भाऊ कदमची नक्कल, व्हिडीओ व्हायरल

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली

रसिका वेंगुर्लेकरने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीला तिच्या हास्यजत्रेतील सहकलाकारांविषयी विचारण्यात आलं. यावर रसिका म्हणाली, “समीर दादाचा सेन्स ऑफ ह्युमर, नम्रता ताईमधील वैविध्यता, शिवाली परबचा आत्मविश्वास, प्रसाद सरांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व-हजरजबाबीपणा, वनिता खरातचा बिनधास्तपणा आणि प्राजक्ता माळीचा निरागसपणा या सगळ्या गोष्टी मला नक्कीच आत्मसात करायला आवडतील.”

हेही वाचा : प्रसिद्ध मराठी गायिकेला मिळाली सचिन तेंडुलकरसमोर गाण्याची संधी, अनुभव शेअर करत म्हणाली, “ते आणि अंजली खूप…”

रसिका पुढे सई ताम्हणकरविषयी म्हणाली, “तिचा बोल्डनेस, बिनधास्तपणा सगळंच चांगलंय…सई ताम्हणकर माझं लेडी क्रश आहे. त्यामुळे तिच्यामधल्या बऱ्याच गोष्टी मी आत्मसात करेन.”

हेही वाचा : Video : “देहूगावची माती, तुळस अन्…”, सोनाली कुलकर्णीने हाताने घडवली बाप्पाची मूर्ती; म्हणाली, “यंदा गणेशोत्सव भावनिक…”

“सगळेच प्रेक्षक आमच्यावर खूप प्रेम करतात. प्रेक्षकांकडून आम्हाला सर्वांनाच अनेक मेसेज येत असतात. हास्यजत्रेवर असंच प्रेम करत राहा…यातून आम्हाला खूप ऊर्जा आणि सतत चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.” असं रसिका वेंगुर्लेकरने सांगितलं. दरम्यान, रसिका सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या पर्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Story img Loader