Maharashtrachi Hasya Jatra Fame Shivali Parab Sister Sneha Parab : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर हा विनोदी कार्यक्रम संपूर्ण जगभरात पाहिला जातो. हास्यजत्रेमुळे निखिल बने, वनिता खरात, गौरव मोरे, ओंकार राऊत, ईशा डे, प्रियदर्शिनी इंदलकर या कलाकारांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला.
हास्यजत्रेमुळे आणखी एक अभिनेत्री सर्वत्र चर्चेत आली ती म्हणजे प्रेक्षकांची लाडकी शिवाली परब. नाटक, विविध गाण्यांचे अल्बम, सिनेमे यामुळे घराघरांत ती लोकप्रिय झाली. आता शिवालीला सर्वत्र कल्याणची चुलबुली म्हणून ओळखलं जातं. मात्र, तुम्हाला माहितीये का? तिला सख्खी बहीण सुद्धा आहे.
शिवालीच्या बहिणीचं नाव स्नेहा परब आहे. शिवालीची बहीण देखील दिसायला खूपच सुंदर आहे. स्नेहा देखील आपल्या बहिणीप्रमाणे बोल्ड अन् बिनधास्त आहे. या दोघी बहिणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या दोघींमध्ये खूप चांगलं बॉण्डिंग आहे. स्नेहा मॉडेल आणि सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखळी जाते. मात्र, आता तिने इंडस्ट्रीत सुद्धा पदार्पण केलं आहे.
‘सोन्याची खान’ हे स्नेहाचं नवीन गाणं नुकतंच सर्वत्र प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ती मुख्य नायिका म्हणून झळकली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवाली सुद्धा या गाण्याचं जोरदार प्रमोशन करत होती. ‘सोन्याची खान’ या गाण्यात स्नेहा सुंदर असा डान्स करताना दिसली आहे. हे गाणं शैलेश राठोड याने गायलं असून त्यानेच कंपोझ केलं आहे.
दरम्यान, स्नेहाच्या या नव्या गाण्यावर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे आणि तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.