‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आजच्या घडीला जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे जगभरातील विविध ठिकाणी दौरे होत असतात. गेल्या वर्षभरात अमेरिका, सिंगापूर, दुबई याठिकाणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे लाइव्ह शो करण्यात आले होते. सिंगापूरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाची खास झलक अभिनेत्री वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, निखिल बने, रोहित माने, वनिता खरात या कलाकारांना घराघरांत एक नवीन ओळख मिळाली. हास्यजत्रेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. घराघरांत आवर्जून हा कार्यक्रम पाहिला जातो. या कार्यक्रमाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील मराठी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं.

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड कलाकार दिसणार ‘या’ ड्रेसकोडमध्ये; पाहुण्यांसाठी जेवणाचा मेन्यू आहे खूपच खास

जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर दौऱ्यावर जात असते. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाची संपूर्ण टीम सिंगापूर दौऱ्यावर गेली होती. यावेळी या टीमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. याबद्दल वनिताने खास पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

हेही वाचा : “मला हा निर्णय…”, २६ दिवस बेपत्ता होण्याबद्दल गुरुचरण सिंगने सोडलं मौन; कायदेशीर बाबींचा उल्लेख करत म्हणाला…

“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला आता फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. Thank you Singapore इतकं प्रेम दिल्याबद्दल” अशी पोस्ट शेअर करत वनिताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय या व्हिडीओमध्ये समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत यांच्या परफॉर्मन्सची झलक सुद्धा पाहायला मिळत आहे. शो संपल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशन देत कलाकारांचं कौतुक केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमधला पहिला फोटो आला समोर, ओरीने दाखवली लक्झरी क्रूझची झलक

हेही वाचा : Video: मलायका अरोराने उचलला रस्त्यावर पडलेला कचरा, अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, वनिता खरातने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर, वनिताचा पती सुमीत लोंढे यांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय काही युजर्सनी वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओवर, “हास्यजत्रेने टेलिव्हिजन माध्यमात नवीन रेकॉर्ड केला आहे, खूप कमाल आणि धमाल शो, असा कार्यक्रम पुन्हा होणे नाही”, “अटकेपार झेंडा”, “क्या बात है…” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.