Maharashtrachi Hasya Jatra Fame Prajakta Mali : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी हास्यजत्रेच्या लाइव्ह शोजचं आयोजन केलं जातं. नुकतेच हे सगळे कलाकार त्यांच्या दुसऱ्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून हा शो ब्रेकवर होता. आता पुन्हा एकदा या शोचा नवा सीझन प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. याची खास झलक प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ह्या शोने ब्रेक घेतला होता. त्यामुळे प्रेक्षक हा शो पुन्हा कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत होते. याच संदर्भात सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले. शिवाय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री प्राजक्ता माळी सांभाळत आहे. मागील काही पर्वांपासून प्राजक्ता या टीमचा अविभाज्य भाग झालेली आहे. त्यामुळे यंदा नव्या सीझनचं शूटिंग सुरू झाल्यावर प्राजक्ताने खास व्हिडीओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

हेही वाचा : Bigg Boss फेम अभिनेत्रीने गोव्यात बांधला भलामोठा आलिशान बंगला! ‘ड्रीम हाऊस’ म्हणत शेअर केले फोटो; म्हणाली, “हा प्रवास…”

सोशल मीडियावर प्राजक्ताने हास्यजत्रेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने हास्यरसिकांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘We Are Back!’ असं म्हणत व्हिडीओमधून तिने नव्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या व्हिडीओमध्ये हास्यजत्रेतील सगळे कलाकार दिसत आहेत.

येत्या २ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शूट केल्याचं पाहायला मिळत आहे. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं सगळे कलाकार प्रेक्षकांना सांगताना दिसत आहे.

हेही वाचा : अवघ्या ६ महिन्यांत गाशा गुंडाळणार कलर्स मराठीची मालिका? मुख्य अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “शेवटचे काही…”

प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक खूश झाले असून सर्वजण या नव्या सीझनसाठी आतुर आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीची हॅटट्रिक!’ या नव्या सीनलचा २ डिसेंबरपासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

Story img Loader