Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लवकरच या कलाकारांचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओकने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. हास्यजत्रेचे परीक्षक, यामधले काही कलाकार, शोचे दिग्दर्शक हे सगळे या नव्या चित्रपटाचा अविभाज्य भाग असणार आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) कार्यक्रमाच्या कलाकारांच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘गुलकंद’. हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात कौटुंबिक मनोरंजन आणि कॉमेडीचं अनोखं कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. ‘गुलकंद’ चित्रपटाचे सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया निर्माते आहेत.

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार

हेही वाचा : Video: शुभमंगल सावधान! भगरे गुरुजींच्या मुलाचं थाटामाटात पार पडलं लग्न, पारंपरिक पद्धतीने झाला गृहप्रवेश, पाहा व्हिडीओ

चित्रपटाचे नाव, भन्नाट टीम यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक – निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, ‘’या सगळ्यांबरोबर मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक बॉण्डिंग आहे आणि आमची हीच केमिस्ट्री यातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल. ही एक अशी कथा आहे, ज्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात. ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे.’’

हेही वाचा : Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

हेही वाचा : मृणाल दुसानिसच्या नव्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले ‘हे’ मराठी कलाकार! शशांक केतकर मैत्रिणीबद्दल म्हणाला, “जिद्द, मेहनत…”

तसेच निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, ‘’चित्रपटाची कथा ऐकताक्षणी मला आवडली. मुळात ही एक मुरलेली टीम ( Maharashtrachi Hasya Jatra ) आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कमाल आहे. आजच्या धावपळीच्या जगात प्रेक्षकांना असे हलके-फुलके विषय पाहायला आवडतात. हा चित्रपट पाहून प्रेक्षक हसतमुखाने थिएटरबाहेर पडतील. आपल्या प्रियजनांबरोबरच्या आठवणी जपण्यासाठी आमचा हा खास प्रयत्न आहे.’’

Story img Loader