सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहे. २०२३ सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सध्या सर्वत्र नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरु आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. त्यातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने सर्वांना नववर्षानिमित्त खास भेट दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फारच लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. येत्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमकडून खास भागाचे आयोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याच्या फेसबुकवरुन अश्लील पोस्ट झाल्या शेअर, नेमकं प्रकरण काय?

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
lokmanas
लोकमानस: भ्रष्टाचार सहन करण्याशिवाय पर्याय आहे?

येत्या १ जानेवारी २०२३ रोजी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सलग २३ तास प्रक्षेपित केला जाणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने याचा एक प्रोमोदेखील शेअर केला आहे. या प्रोमोत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे विनोदवीर पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

“सलग २३ तास होणार हास्याचा हाहाकार, पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. १ जानेवारी २०२३, रविवारी, सकाळी ७ वाजल्यापासून.
फक्त आपल्या सोनी मराठीवर!” असे कॅप्शन या प्रोमोला देण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमकडून प्रेक्षकांना खास भेट दिली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आंनदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.