सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे घराघरात प्रसिद्ध आहेत. नुकतंच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या संपूर्ण टीमने पहिला परदेश दौरा केला. या दौऱ्यावरुन परतल्यानंतर आता यातील सर्वच कलाकार भावूक झाले आहेत. नुकतंच हास्यजत्रेच्या एका कलाकाराने दुबई दौऱ्यावर पोस्ट शेअर केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला विनोदी कलाकार पृथ्वीक प्रताप हा कायमच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो आणि व्हिडीओही पोस्ट केले आहेत.

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

पृथ्वीक प्रतापची पोस्ट

“पहिला परदेश दौरा
६ वर्षांपूर्वी फक्त डॉक्यूमेंट म्हणून काढलेला पासपोर्ट आता खऱ्या अर्थाने कामी आला.
‘४८ तासांच्या’ या दौऱ्यात खरंतर ‘लाखमोलाच्या’ आठवणी साठवून आलोय.
विमानातून दिसणारा ‘इवलूसा’ देश.. जमिनीवर तोऱ्यात उभा असलेला ‘भलाऽऽऽ मोठ्ठा’ बुर्ज खलिफा…
आणि ‘कमाल, खूप सारं, अत्यंत, जास्त, अतिव, किती तरी पटीने, वगैरे वगैरे विशेषण छेदत प्रेक्षकांनी दिलेलं “आभाळाएवढं” प्रेम.
हे सगळं कायम स्वरुपी मनाशी घट्ट बिलगून ठेवलंय.

आपल्या येण्यांन टाळ्या, शिट्ट्या पडाव्या… आपलं नाव घेत एखादा परिसर प्रेक्षकांनी दणाणून सोडावं… हे सगळ फक्त स्वप्नात पाहिलं होतं.. आता ते प्रत्यक्षात जेव्हा अनुभवतोय तेव्हा जास्त गहिवरून येतं, भावूक सुद्धा व्हायला होतं… पण त्यापेक्षाही जास्त बळ मिळतं… ते म्हणजे आणखी जोमाने काम करण्याचं. आणखी मेहनत करण्याचं.

दुबई मध्ये प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पाहून माझी मैत्रीण प्रियदर्शिनी इंदलकर माझ्या एका परफॅारमन्स नंतर एक वाक्य म्हणाली होती ते सरकन डोळ्यांसमोर आलं ‘Trust me, PP will be the new SRK’

तेव्हा हे वाक्य मी मस्करीत घेतलं होतं पण आता यापुढे हेच वाक्य मी सत्यात अवतरण्यासाठी कलाकार म्हणून नव्याने उभा राहीन…
आणि I believe ‘कलेला जर प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळाली तर प्रत्येक कलाकार यशस्वी होऊ शकतो, हवं ते मिळवू शकतो’.

सई ताम्हणकरचेही धन्यवाद कारण तिने मला PP हे नाव दिले आहे.

(ता.क. हास्यजत्रे चे आभार किती आणि कसे मानावे हे उमगत नाहीये पण मोटे सर, गोस्वामी सर, फाळके सर, सोनी मराठी आणि आमचे हास्यजत्रेतले कालाकार यांच्याशिवाय हे सगळं केवळ अशक्य.)”, असे पृथ्वीक प्रतापने म्हटले.

दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचा पहिला परदेश दौरा दुबईत पार पडला. या कार्यक्रमावेळी दुबईतील अनेक नागरिक उपस्थित होती. त्यावेळी हास्यजत्रेच्या मंडळींनी लाईव्ह परफॉर्मन्स सादर केले. गेल्या १५ जानेवारीला हास्यजत्रेचा लाइव्ह कार्यक्रम दुबईतील शेख रशिद ऑडोटोरियममध्ये पार पडला.