scorecardresearch

Video : प्राजक्ता माळीकडून वनिता खरातला लग्नाची खास भेट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

त्याचा एक व्हिडीओ वनिताने शेअर केला आहे.

vanita kharat prajakta mali
वनिता खरात प्राजक्ता माळी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वनिता खरातच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीने वनिता खरातला लग्नाची खास भेटवस्तू दिली आहे. त्याचा एक व्हिडीओ वनिताने शेअर केला आहे.

वनिता खरात ही बॉयफ्रेंड सुमित लोढेंसह २ फ्रेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वनिताने तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती आणि प्राजक्ता माळी पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : मिठी, रोमान्स अन्…; वनिता खरातचं बॉयफ्रेंडसह प्री-वेडिंग फोटोशूट

यात त्या दोघीही वनिताच्या लग्नाबद्दल गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी प्राजक्ता ही वनिताला लग्नाचे खास गिफ्ट देताना पाहायला मिळत आहे. यावेळी तिने तिला ‘प्राजक्तराज’मधील सोनसळा या प्रकारातील दागिन्यांचे संपूर्ण कलेक्शन भेट म्हणून दिले आहे. त्यावेळी तिने तोडे, बेलपानटीक, वर्जटीक असे विविध दागिने दिले आहेत. विशेष म्हणजे वनितालाही तिने दिलेले हे दागिने फार आवडले आहेत.

या व्हिडीओला प्राजक्ताने खास कॅप्शन दिले आहे. “वनिता…तुझ्यावर सोनसळा कलेक्शन अत्यंत शोभून दिसेल याची खात्री आहे मला…तुला तुझ्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”, असे प्राजक्ताने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “ओठांचे मग चुंबन…” वनिता खरातच्या प्री-वेडिंग शूटचा पहिला फोटो समोर

त्यांच्या या व्हिडीओवर अनेकजण विविध कमेंट करताना दिसत आहे. यावेळी काहींनी प्राजक्ताला विविध सल्लेही दिले आहेत. ‘तू दहा वर्षांपूर्वी प्राजक्तराज काढायला हवं होतंस, यासाठी आता परत लग्न करावं लागेल’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने ‘मस्तच गिफ्ट आहे. मला सांगा कुठे मिळतेय हेय सर्वे दागिने’, असे तिला विचारले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 16:20 IST