“शेवटचा हॅशटॅग महत्त्वाचा…” ओंकार राऊतच्या ‘त्या’ पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट चर्चेत

ओंकार राऊतच्या पोस्टवर प्रियदर्शनीने केलेल्या कमेंटने वेधलं लक्ष

priyadarshini indalkar, onkar raut
ओंकार राऊतच्या पोस्टवर प्रियदर्शनीने केलेल्या कमेंटने वेधलं लक्ष

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्रियदर्शनी इंदलकरकडे पाहिले जाते. प्रियदर्शनीचा ‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी (२२ मार्च) प्रदर्शित झाला. या निमित्ताने सिनेसृष्टीतील व्यक्तींसाठी खास प्रिमिअरचे आयोजन करण्यात आले होते. नुकतंच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार राऊतने प्रियदर्शनीच्या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

ओंकार राऊतने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने प्रियदर्शनीबरोबरचे काही फोटोही पोस्ट केले आहे. त्याला कॅप्शन देताना त्याने प्रियदर्शनीच्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच ओंकारने “सगळ्यांनी फुलराणी चित्रपट गृहात जाऊन पहा”, असे आवाहनही चाहत्यांना केले आहे.
आणखी वाचा : “ज्या पद्धतीने ओमकार तुझ्याकडे पाहतोय…” आस्ताद काळेच्या कमेंटने वेधलं लक्ष, ‘हास्यजत्रे’तील अभिनेत्री म्हणाली “काय तुम्ही…”

ओंकार राऊतची पोस्ट

“अभिनंदन आणि शुभेच्छा प्रियदर्शनी

तू खरंच खूपच छान काम केलं आहेस! सुबोध भावे आणि विक्रम गोखले यांच्याबरोबर उभं राहणं, अभिनय करणं हे सोपं नाही. पण तू ते लीलया पार पाडलं आहेस! मला तुझा खूप अभिमान आहे आणि आनंदही. असाच प्रत्येक क्षणांचा आनंद घे !!

सगळ्यांनी फुलराणी चित्रपट गृहात जाऊन पहा!!

P.S. : तू विक्रम गोखल्यांसोबत balldance केलास! और क्या चाहीये!!”, अशी पोस्ट ओंकार राऊतने केली आहे.

त्याबरोबरच “फुलराणी, झाली ब्यूटी फुलराणी, झगामगा आणि मला बघा, शेवंता तांडेल, थ्री टाईम ब्यूटी क्वीन, मिस कोलिवाडा, नो कॉन्ट्रोवर्सी प्लीझ” असे हॅशटॅग ओंकार राऊतने दिले आहेत.

ओंकार राऊतच्या या पोस्टवर प्रियदर्शनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. “खूप खूप धन्यवाद!! PS – हे screen वर बघताना मलाही विश्वास बसत नव्हता! आणि हो, last hashtag महत्वाचा..!” असे तिने कमेंट करताना म्हटले आहे.

प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट

आणखी वाचा : “मला ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’साठी नाकारण्यात आलं होतं” प्रियदर्शनीचा खुलासा, म्हणाली “तेव्हा सचिन सरांनी…”

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनी इंदलकर हिने इन्स्टाग्रामवर वनिता खरातच्या लग्नाचे काही खास फोटो पोस्ट केले होते. यावेळी तिने ओंकार राऊतबरोबरचा एक खास फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्या दोघांनीही या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 08:15 IST
Next Story
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, जोडप्याच्या साधेपणाने वेधलं लक्ष
Exit mobile version