छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. नुकतंच या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर मराठी चित्रपटात झळकणार आहे. फुलराणी असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शनीने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेसाठी ऑडिशनदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला फुलराणी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेसाठी मला नकार मिळाला होता, असा खुलासा केला. त्यावेळी तिच्या आईने तिला हास्यजत्रेत संधी कशी मिळाली? याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “मी प्रियदर्शनीला ओळखत नव्हतो, ती हास्यजत्रेत…” सुबोध भावेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Supriya Sule Sunetra Pawar
“बारामतीत माझ्याविरोधात…”, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…

“अफलातून लिटील मास्टर्समध्ये असताना एका निर्मात्याने अचानक मला फोन केला. त्यावेळी त्यांनी मला प्रियदर्शनी ही सध्या काय करते, असे विचारले होते. तर तेव्हा मी त्यांना सध्या ती अनबॉक्स नावाची नाट्यसंस्था आहे. त्यात ती विविध नाटक सादर करते, भाग घेते आणि बक्षीस मिळवते वैगरे असं सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला तिला हास्यजत्रेच्या ऑडिशनसाठी पाठवा ना तिला? असे सांगितले. मग मी प्रियदर्शनीच्या मागे लागून लागून ते म्हणतात, तर जाऊन ऑडिशन देऊन ये असं करुन मी तिला पाठवलं. त्यावेळी तिची निवड झाली”, असे तिच्या आईने सांगितले.

त्यानंतर प्रियदर्शनीने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “मी हास्यजत्रेच्या सुरुवातीला एकदा ऑडिशन दिले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये सर्व सिनीअर कलाकार होते. नम्रता, प्रसाद, भक्ती ताई, समीर दादा, विशाखा ताई, पॅडी दादा हे सर्व कलाकार त्यावेळी होते.” असे प्रियदर्शनी म्हणाली.

आणखी वाचा : “माझा प्रेमावर…” ब्रेकअपनंतर प्राजक्ता माळीने पहिल्यांदा केले प्रेमाबद्दल भाष्य 

“त्यावेळी मला सचिन सरांनी आता जरा तू या वयोगटात बसत नाहीस. आपण नंतर बघूया,असं सांगितलं होतं. त्या ऑडिशनवर त्यांनी मला नाटकाची ऑफर दिली होती. “आमच्या ‘ही’ च प्रकरण” हे त्यांचं नाटक होतं. त्यात मी १०० व्या प्रयोगानंतर रिप्लेसमेंटचं काम केलं होतं. त्याचे प्रयोग झाल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सीझनच्या ऑडिशन सुरु झाल्या. त्यानंतर मग हा प्रवास सुरु झाला. तेव्हा मला आणि शिवालीला तेव्हा सिझनच्या शेवटी खास बक्षीस मिळालं होतं”, असे प्रियदर्शनी म्हणाली.

दरम्यान फुलराणी हा चित्रपट येत्या २२ मार्चला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुबोध भावे विक्रम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सुशांत शेलार सौरभ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाची ट्रेलर, गाणी सुपरहिट झाली आहेत.