Priyadarshini Indalkar On Relationship : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. ‘पुण्याची विनम्र अभिनेत्री’ म्हणून ती अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. प्रियदर्शिनीने तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सह ती काही सिनेमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
प्रियदर्शिनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रियदर्शिनी तिचे अनेक स्टायलिश फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या पोस्टखाली चाहते अनेकदा तिला लग्नाविषयी विचारत असतात. तसंच तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलसुद्धा विचारणा करतात. अशातच अभिनेत्रीनं स्वत:च तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.
तू सिंगल आहेस का? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली…
प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांचा ‘लग्नाचा शॉट’ नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिने प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी प्रियदर्शिनीला प्रणितने ‘तू सिंगल आहेस का?’ असं विचारलं. यावर प्रियदर्शिनीने ‘हो’ असं उत्तर दिलं. पुढे प्रणितने तिला ब्रेकअप कधी झालं आणि रिलेशनशिपविषयी विचारलं. तेव्हा अभिनेत्रीने गेल्यावर्षी म्हणजेच, एप्रिल २०२५ मध्ये ब्रेकअप झालं असल्याचं सांगितलं.
प्रियदर्शिनी इंदलकरचा ‘या’ कारणामुळे झालं ब्रेकअप
नंतर प्रणितने तिला ब्रेकअपचं कारणसुद्धा विचारलं. त्यावर प्रियदर्शिनी म्हणाली, “जुळलं नाही. Compatibility नव्हती.” पुढे प्रणितने तिला रिलेशनशिप Toxic होतं का? असं विचारलं. त्यावर प्रियदर्शिनी म्हणाली, “नाही… तो किंवा मी Toxic नव्हतो. पण आमचं रिलेशनशिपच Toxic झालं होतं.” पुढे ब्रेकअपचा निर्णय माझाच असल्याचा होता असं सांगत ती म्हणाली, “त्याला लवकर लग्न करायचं होतं. कारण तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि मला घाई नव्हती. यावरून आमच्यात वाद सुरू झाले आणि मग त्यामुळे ते जमून आलं नाही.”
प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला चाहत्याचा ‘तो’ किस्सा
यानंतर तिने एका चाहत्याने तिला ई-मेलवर लग्नासाठी मेसेज केल्याचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “तीन-चार वर्षांपूर्वी ई-मेलवर एका माणसाने मला त्याचा बायोडाटा पाठवला होता. तो तेव्हा ३५ वर्षांचा होता आणि मी २४-२५ वर्षांची होते. त्यात त्याने घर या ठिकाणी आहे, प्रॉपर्टी किती आहे, लग्नानंतर आपण इथे राहू, लग्न कुठे होईल, कोणती नोकरी करतो, किती कमावतो आणि अशी बरीच माहिती सांगितली होती.”
दरम्यान, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकरचा ‘लग्नाचा शॉट’ सिनेमा येत्या ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत, संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. तर अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

