‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रसिद्धीझोतात आली. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये विशाखाने आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला आहे. विशाखा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. १९९८ मध्ये विशाखाने महेश सुभेदार यांच्याशी लग्नगाठ बांधली. विशाखाचे पती महेश सुभेदार हे सुद्धा मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. नुकतंच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विशाखाने तिच्या हनिमूनचा किस्सा सांगितला आहे.




मुलाखतीत विशाखाला तुमच लहान वयात लग्न झालं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना विशाखा म्हणाली, मी २१ वर्षांची असताना माझं लग्न झालं. मी हनिमूनला होते तेव्हा माझ्या पदवीच्या शेवटच्या वर्षाचा ऱिझल्ट आला होता. त्यावेळेस मला वाटलं आपण खूपच लवकर लग्न केलं आहे. माझं लवकर लग्न झालं पण ते चांगलं झालं. मी आता ४६ वर्षांची आहे पण माझा मुलगा आता २३ वर्षाचा आहे.
विशाखा पुढे म्हणाली, माझ्या आणि माझ्या मुलाच्या वयात कमी अंतर असल्यामुळे आमचं नात खूप घट्ट आहे. आमचं नातं मैत्रीपूर्ण आहे. तो मला मैत्रीण पण समजतो. मला आईपण समजतो. काही गोष्टी माझ्यापासून लपवून पण ठेवतो. काही गोष्टी हक्काने सांगतो. आमच्यात लटके भांडणंपण होतात.”
हेही वाचा- “…वाईट मनस्थिती झाली होती”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “फक्त दोन सीन…”
दरम्यान एका मुलाखतीत विशाखाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. विशाख म्हणाली, “हास्यजत्रेत माझे खूप लाड झाले, मला फटकारलंही गेलं, मला टोमणेही खावे लागले; जे प्रत्येक कलाकाराला खावे लागतात. जर कलाकाराचं काम चांगलं झालं नाही तर त्याला बोलणी खावी लागतात आणि जर चांगलं झालं तर त्याची वाहवाही ते करतात. मी हास्यजत्रा म्हणूनच सोडलं कारण मी कुठे आहे हे मला तपासून पाहायचं होतं.”