अभिनेता दत्तू मोरे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचला. अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकणारा दत्तू काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अचानक लग्न करत दत्तूने चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. दत्तू मोरेने पत्नी स्वाती घुनागेसह 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत दत्तूने त्याच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. दत्तूने लग्नानंतरचा पत्नीबरोबरचा हनिमूनचा प्लॅनही या मुलाखतीत सांगितला. "लग्नानंतर फिरायला कुठे जाणार?" असा प्रश्न दत्तूला विचारला गेला. यावर त्याने "आम्ही बालीला फिरायला जाणार आहोत," असं उत्तर दिलं. https://www.instagram.com/p/CslPRR0yfrE/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== हेही वाचा>> दत्तू मोरेच्या लग्नाला होता सासऱ्यांचा विरोध, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “पळून जाणं..” "हनिमूनला बालीला जायचं कोणी ठरवलं?" असंही दत्तूला विचारण्यात आलं. यावर दत्तू म्हणाला, "आम्ही दोघांनीही बालीला जायचं ठरवलं. विश्वास बसणार नाही, पण कधीकधी आम्ही दोघंही एकमेकांना एकच मेसेज करतो." हेही वाचा>> ९५व्या वर्षीही लग्नसमारंभात ड्रम वाजवून पोट भरायचे आजोबा, उर्फी जावेदने केली मदत, दर महिन्याला पैसे पाठवणार अन्… दत्तूने २३ मे रोजी कोर्ट मॅरेज पद्धतीने स्वाती घुनागे हिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर दत्तूचे रिसेप्शन सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले होते. दत्तूची पत्नी स्वातीने नुकतंच लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.