Premium

दत्तू मोरेच्या लग्नाला होता सासऱ्यांचा विरोध, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “पळून जाणं..”

दत्तू मोरेचा लग्नाबाबत खुलासा. म्हणाला…

dattu-more-talk-about-marriage
दत्तू मोरेचा लग्नाबाबत खुलासा. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. याच शोमधून अभिनेता दत्तात्रय मोरे घराघरात पोहोचला. लाघवी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या लाडक्या दत्तूने काही दिवसांपूर्वीच नवीन आयुष्याला सुरुवात केली. दत्तूने २३ मे रोजी स्वाकी घुनागे हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नानंतर दत्तू मोरेने पत्नी स्वाती घुनागेसह ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत दत्तूने त्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला. त्यांच्या लग्नाला दत्तूचे सासरे म्हणजेच स्वातीच्या वडिलांचा विरोध होता, असा खुलासा दत्तूने केला. दत्तूची पत्नी स्वाती म्हणाली, “मी लग्नाबाबत घरी सांगितल्यावर आईने लगेच होकार दिला. परंतु, बाबा या लग्नासाठी तयार नव्हते. माझ्या घरचे सगळे डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टर जावई हवा होता. पण, दत्तूने त्यांची भेट घेतल्यानंतर ते तयार झाले.”

हेही वाचा>> ९५व्या वर्षीही लग्नसमारंभात ड्रम वाजवून पोट भरायचे आजोबा, उर्फी जावेदने केली मदत, दर महिन्याला पैसे पाठवणार अन्…

याबाबत दत्तू खुलासा करत म्हणाला, “मी स्वातीच्या वडिलांना भेटलो आणि त्यांना समजावलं. पळून जाणं, ही गोष्ट आपल्याला शोभणार नाही. तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्या मला सांगा. मला कोणतंही व्यसन नाही, हेही मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मग कोणतीही अट न ठेवता ते लग्नासाठी तयार झाले.”

हेही वाचा>> “आपली जात वेगळी आहे”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितला ब्रेकअपचा अनुभव, म्हणाला, “तिचे आईबाबा…”

पुढे दत्तूने त्याच्या आईवडिलांचं लग्नाबद्दल काय मत होतं, याबद्दलही सांगितलं. “लव्ह मॅरेज हा आपला बेसिक प्रॉब्लेम आहे. लग्नाबद्दल मी सगळ्यात आधी आईला सांगितलं. बाबांना मी १०-१२ दिवस आधी लग्नाची कल्पना दिली. ते भडकणार होते, हे मला माहीत होतं. समाजाचा विचार आणि लव्ह मॅरेज असल्यामुळे आई सुरुवातीला नाही म्हणत होती. माझ्या तीन बहिणींना मी १५ दिवसांनी मध्ये मध्ये आईला विचारायचं असं सांगून ठेवलं होतं. बहिणींनी तिला समजावलं आणि मग ती तयार झाली,” असं दत्तूने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame dattu more talk about his marriage and father in law kak