टेलीव्हिजन विश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही लाखो प्रेक्षकवर्ग आहे. या कार्यक्रमामुळे नवोदित कलाकारांना नवी ओळख मिळाली असून सध्या ते रुपेरी पडद्यावरील पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक म्हणजे दत्तू मोरे. दत्तू मोरेची बायको ही डॉक्टर असून नुकतंच तिने स्वतःचं ठाण्यात पहिलं क्लिनिक सुरू आहे. याची माहिती अभिनेत्याने इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेचे दत्तूला म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं. ठाण्यातील चाळीत राहणाऱ्या दत्तूला एक नव्हे तर दोन घरं लागली. या आनंदाच्या वातावरणात अजून एक आनंदाची बातमी दत्तूने दिली. अभिनेत्याची पत्नी स्वाती घुनागेने (मोरे) ठाण्यात स्वतःचं पहिलं वहिलं क्लिनिक सुरू केलं आहे, याचे फोटो शेअर करत दत्तूने पोस्ट केली आहे.

हेही वाचा – Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला उखाणा घेताना दाटून आला कंठ, पाहा साखरपुड्याचा सुंदर व्हिडीओ

“आयुष्य किती कठीण वाटतं असेल तरी तुम्ही काहीतरी करू शकता आणि त्यात यशही प्राप्त करू शकता. घुनागे हॉस्पिटलनंतर…बायकोचं ठाण्यातलं पहिलं क्लिनिक…अजून एक नवीन सुरुवात…प्रिय बायको, तुला खूप खूप शुभेच्छा…आणि खूप खूप प्रेम…”, असं लिहित दत्तूने क्लिनिक बाहेरचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्याच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रियदर्शनी इंदलकर, चेतना भट्ट यांनी दत्तू व त्याच्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – सिद्धू मुसेवाला मागे सोडून गेलाय कोट्यवधींची संपत्ती, ५८ वर्षांच्या आईने बाळाला जन्म दिल्यानंतर घराला मिळणार नवा वारस

दरम्यान, दत्तू मोरेची बायको स्वाती ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. तिचं पुण्यातही स्वतःचं क्लिनिक आहे. याशिवाय स्वाती सामाजिक कार्यात सक्रिय असते. गेल्या वर्षी दत्तू व स्वातीचं लग्न झालं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame dattu more wife swati ghunage more start first clinic in thane pps
First published on: 03-03-2024 at 10:08 IST