Gaurav More Johnny Lever Birthday Wish: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे आणि त्याची पत्नी प्रियांका कारेकर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहेत. निमित्त आहे बॉलीवूडचे दिग्गज कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्या वाढदिवसाचे. प्रियांका कारेकरने जॉनी लिव्हर यांच्याबरोबर काम केले असल्याने त्यांची गौरव आणि प्रियांकाशी खूप जवळची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच जॉनी लिव्हर यांनी गौरव मोरेच्या नवीन घरी भेट देऊन सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. आता जॉनी लिव्हर यांच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी गौरव आणि प्रियांका या दोघांनीही सोशल मीडियावर अनसीन फोटो शेअर करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
गौरव मोरेची पत्नी प्रियांका कारेकर हिने जॉनी लिव्हर यांच्याबरोबर काम केलं आहे. त्यामुळे जॉनी लिव्हर यांची तिच्याशी व गौरव मोरेशी ओळख झाली. गौरव मोरेच्या नवीन घरी जॉनी लिव्हर आले होते, तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या पती-पत्नीने त्यांच्या वाढदिवशी भावना व्यक्त केल्या आहेत.
गौरव मोरेची पोस्ट
“प्रिय जॉनी लिव्हर सर, आज तुमचा वाढदिवस. तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा असेच आमच्या पाठीशी कायम राहा, आपला आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या..आपला सहवास, आपले मार्गदर्शन, नेहमीच प्रेरणादायी राहील. तुम्ही असेच हसत राहा आणि हसवत राहा सर. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,” असं गौरव मोरेने त्यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत लिहिलं.
जॉनी लिव्हर यांचा मुलगा जेस्सी लिव्हर याने गौरवच्या या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट केला आहे.
प्रियांका कारेकरची पोस्ट
प्रियांकाने जॉनी लिव्हर यांच्याबरोबरचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. “मला या वर्षी भेटलेली एक अद्भुत व्यक्ती… तुम्हाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कायम आनंदी राहण्यासाठी मनापासून शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जॉनी लिव्हर सर,” अशी पोस्ट प्रियांका कारेकरनी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जॉनी लिव्हर यांनी गौरव मोरेच्या नवीन घरी भेट दिली होती. त्यावेळी गौरव व त्याच्या कुटुंबाने खूप उत्साहाने त्यांचं स्वागत केलं होतं आणि त्यांचा आदर-सत्कार केला होता. जॉनी लिव्हर यांनी मोरे कुटुंबियांना भेटून त्या सर्वांशी गप्पा मारल्या होत्या. तसेच गौरव व प्रियांकासाठी भेटवस्तूही आणल्या होत्या.
