छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमी चर्चेत असतो. गेल्या साडे पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम करत आहे. या कार्यक्रमाचा प्रेक्षक फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जगभरात आहे. ज्याप्रमाणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याप्रमाणेच कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचा मोठा चाहता वर्ग आहे.

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचा ऑस्ट्रेलिया दौरा झाला. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची अजूनही चर्चा आहे. कारण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार ऑस्ट्रेलियातील मजेशीर व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच नम्रता संभेरावने ऑस्ट्रेलियातील प्रसाद खांडेकरचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून प्रसाद भडकला अन् म्हणाला, “रुको…सबका बदला लेगा रे पश्या”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – विकास पाटीलच्या बायकोनं ४० प्रयोगांनंतर पाहिलं ‘ऑल दि बेस्ट’ नाटक, पोस्ट करत म्हणाला, “सगळं जग बघून…”

नम्रता संभेरावने इन्स्टाग्रावर प्रसादचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, “सॉरी, कँट्रोल नाही झालं पश्या. हा ऑडिओ खूप ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी ही पोस्ट करतेय. (btw हा व्हिडिओ jet lag मधला होता. आम्ही ऑस्ट्रेलियात होतो, तेव्हाचा आहे ) बाकी पश्याला आळस येत नाही, तो खूप उत्साही आहे. माझं काही खरं नाही.” या व्हिडीओत प्रसाद पेंगताना दिसत आहे.

प्रसाद स्वतःचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून म्हणाला, “रुको नम्रता. इसका करारा जवाब मिलेगा…सबका बदला लैगा रे पश्या.” प्रसादच्या या प्रतिक्रियेवर नम्रताने हसण्याचे इमोज शेअर केले आहेत.

हेही वाचा- Video: भाऊ कदम यांच्या लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, नम्रताने शेअर केलेल्या प्रसादच्या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “बिचारे प्रसाद सर”, “नम्रता आता तुझी वेळ आली आहे. तयार राहा”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.