Premium

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घरी आणली नवी कार, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन, म्हणाला, “त्याच्या रन्सएवढे…”

अभिनेता ओंकार राऊतने खरेदी केली Baleno गाडी, शेअर केला फोटो

onkar-raut-buy-car
ओंकार राऊतने खरेदी केली Baleno गाडी. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक कलाकारांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेता ओंकार राऊतलाही महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमुळे लोकप्रियता मिळाली. अभिनयाची उत्तम जाण व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओंकार राऊतने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे. ओंकारने मारुती सुझुकी कंपीनीची बलेनो ही गाडी घरी आणली आहे. सोशल मीडियावर नव्या गाडीबरोबरचे फोटो ओंकारने शेअर केले आहेत. फोटोबरोबरच नव्या गाडीसाठी ओंकारने खास पोस्ट लिहिली आहे. ओंकारच्या या गाडीचं सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाशी खास कनेक्शन आहे. “२४/४/२०२३ला नवी baleno घरी आली,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “कर्नाटक निवडणुकीत मतांसाठी…”, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका

“अक्षयतृतीयेला गाडी घेता आली नाही पण योगायोगाने सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला ती घरी आली! (साडे तीन मुहूर्तांपैकी नसला तरी हा ही देवाचाच दिवस!) सचिनच्या average एवढ, तिचं mileage असावं! सचिन च्या runs एवढे, तिचे kilometers व्हावे! सचिनच्या straight drive एवढी smooth तिची drive असावी!,” असंही पुढे ओंकारने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> २ हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर ‘शार्क टँक इंडिया’ फेम अनुपम मित्तलचं ट्वीट, मोदी सरकारवर टीका करत म्हणाला…

ओंकारच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. ओंकारने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘काळे धंदे’ या वेब सीरिजमध्येही ओंकार झळकला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame onkar raut buy marutu suzuki baleno car on sachin tendulkar birthday kak

First published on: 20-05-2023 at 13:30 IST
Next Story
२ हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर ‘शार्क टँक इंडिया’ फेम अनुपम मित्तलचं ट्वीट, मोदी सरकारवर टीका करत म्हणाला…